डायरेक्टर थांब म्हणतोय, तरी विनोद खन्ना 'तेव्हा' डिंपलचे ओठ चघळतच होता ! भडकलेल्या डिंपलने.. - पुढारी

डायरेक्टर थांब म्हणतोय, तरी विनोद खन्ना 'तेव्हा' डिंपलचे ओठ चघळतच होता ! भडकलेल्या डिंपलने..

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडचा हँडसम हंक विनोद खन्ना सोबत रोमँटिक सीन करायला अनेक अभिनेत्री घाबरत होत्या. विनोद खन्ना यांचा माधुरी दीक्षितसोबतचा दयावान चित्रपटातील किसिंग सीन इंडस्ट्रीत चर्चेत आला होता. पण ती काही पहिलीच वेळ नव्हती. विनोद खन्ना यांनी डिंपल कपाडियासोबत इंटिमेट सीन चित्रित करताना संयम आवरता आला नव्हता. वास्तविक, महेश भट्ट दिग्दर्शित ‘मार्ग’ या चित्रपटात विनोद आणि डिंपल यांच्यात एक किसिंग सीन चित्रित करण्यात येणार होता.

तरी किस करणे सुरूच ठेवले होते

ज्यामध्ये दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही डिंपल कपाडियाला विनोद खन्ना यांनी किस करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे डिंपल चांगलीच घाबरून गेली. तिने कशीतरी स्वतःची सुटका करून मेकअप रूममध्ये जाऊन लपली. डिंपलला दिग्दर्शकाचा महेश भट्टचा खूप राग आला. विनोद खन्ना दारूच्या नशेत असल्याने कट समजू शकला नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, डिंपलला विनोदवर इतका राग नव्हता, जितका चित्रपटाच्या दिग्दर्शकावर होता. चार वर्षांनंतर ‘प्रेम धरम’ नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला, यानंतरही या अभिनेत्रीने विनोदसोबत अनेक चित्रपट केले.

विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितचा किसिंग सीनही वादात

विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितचा किसिंग सीनही वादात सापडला होता. त्यावेळी माधुरीला 80-90 च्या दशकातील लेडी अमिताभ बच्चन म्हटले जायचे. त्यावेळी माधुरीला जेवढी फी दिली जात होती तेवढी फी इतर कोणत्याही अभिनेत्रीला दिली जात नव्हती.

दयावान चित्रपटात विनोद खन्नासोबत चुंबन दृश्य चित्रित करण्यासाठी दिग्दर्शक फिरोज खान यांनी अभिनेत्रीला १ कोटी रुपयांची रक्कम दिली होती जेणेकरून तिने तक्रार करू नये. चित्रपटाच्या कथेत फारसा ताकद नव्हती, पण माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातील किसिंग सीनने खळबळ उडवून दिली होती.

या सीननंतर माधुरीवर टीका होऊ लागली. यानंतर माधुरीने फिरोज खानवर सीन हटवण्यासाठी दबाव आणला. नोटीसही पाठवली. परंतु तो काढण्यास स्पष्ट नकार दिला.

विनोद खन्ना त्यांच्या व्यक्तिरेखेत इतके तल्लीन व्हायचे की असे वाटायचे की सर्वकाही प्रत्यक्षात घडत आहे. त्या सीनमध्येही असंच काहीसं घडलं होतं. माधुरीसोबत रोमँटिक सीन करताना विनोद इतका बेकाबू झाला होता की त्याने अभिनेत्रीचे ओठ चावले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button