

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेच्या दरम्यान आज (सोमवार) संसदेत सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. विरोधकांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपानंतर नंतर भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी सरकारच्या वतीने हिशोब बरोबर केला. काँग्रेसला चिडवण्यासाठी त्यांनी नरसिंह राव, फिरोज गांधी यांचा उल्लेख केला. जावडेकर म्हणाले की, मी गांधी घराण्याचे नाव ऐकतो पण फिरोज गांधींचे नाव कोणी घेत नाही.
जावडेकर म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेत राजकारणाचीही चर्चा होते. यानंतर त्यांनी आनंद शर्मा यांना म्हटले की, अभिभाषणामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा इतका उल्लेख का होता? ते म्हणाले की, नेताजी आणि सरदार पटेल यांची महानता आता अनेकांना समजायला सुरुवात झाली आहे. शालेय दशेतून बाहेर आल्यानंतर हे लोक विसरले होते. यानंतर गांधी कुटुंबावर निशाणा साधताना ते म्हणाले, मी गांधी घराण्याची सगळी नावे ऐकतो, पण फिरोज गांधींचे नाव ऐकत नाही. सर्व पंतप्रधानांची चर्चा मी ऐकतो. अटलजींचे नाव घेतात, मात्र नरसिंह रावांचे नाव कधीच घेत नाहीत. डॉ. भीमराव आंबेडकरांचा वारंवार संदर्भ घेतो, पण दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव करून त्यांना लोकसभेत येऊ दिले नाही, ते विसरू शकत नाही असे ते म्हणाले.
यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांचे नाव न घेता राज्यसभेत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि ते म्हणाले. मला सर्वात आश्चर्य वाटले की आमच्या एका मित्राने सांगितले की आम्ही लवकरच राम मंदिर बांधू. कमाल आहे. मी 90 मध्येही अयोध्येला गेलो होतो. 92 मध्ये गेलो होतो. ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, तेच आज रामभक्तांसाठी ओरडत आहेत. सर्वजण मंदिरात जात आहेत. सगळे म्हणतात मी हिंदू आहे. ज्या सरकारने राम सेतूच्या वेळी प्रतिज्ञापत्रात राम ही काल्पनिक कथा असल्याचे लिहिले होते, तेच आज राममंदिरावर बोलत आहेत. हा ढोंगीपणा सगळ्यांनाच कळतो.
कोवॅक्सिजन जेव्हा तयार झाली, तेंव्हा काँग्रेसचे सर्व नेता अखिलेश यादव यांच्यासह सर्व नेत्यांनी याला भाजपची लस म्हटले, तसेच लस घेणार नसल्याचे सांगितले. मात्र जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेंव्हा कोवॅक्सिन लस घेतली तेंव्हा सर्वांची बोलती बंद झाली.
हे ही वाचलंत का…