Sputnik light : कोरोनाविरोधात आणखी एक हत्यार ; स्पुतनिक लाईट व्हॅक्सिनला DCGI ची मंजूरी | पुढारी

Sputnik light : कोरोनाविरोधात आणखी एक हत्यार ; स्पुतनिक लाईट व्हॅक्सिनला DCGI ची मंजूरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Sputnik light) कोरोना विरोधात लढण्यासाठी भारताला अजून एक हत्यार मिळाले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सिंगल डोस स्पुतनिक लाईट व्हॅक्सिनला अत्यावश्यक वापरासाठी परवानगी दिली आहे. यानंतर आता कोरोनाविरोधात लढणाऱ्या लसींची संख्या आता देशात ९ झाली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटर वरुन दिली आहे.

DCGI ने भारतात सिंगल डोस स्पूतनिक लाईट कोरोना वॅक्सिनला अत्यावश्यक मंजूरी देण्यात आली आहे. ही देशातील ९ वी लस आहे. जी आता लोकांना देण्यात येणार आहे. यासह महामारी विरोधात देशाला मजबूत करणार आहे. रशियात या लसीला मागिल वर्षी मंजूरी देण्यात आली होती. रशियात आता या लसीचं लसीकरण सुरु आहे. अस ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी म्हटलं आहे. (Sputnik light)

देशाला मिळाली ९ वी कोरोना लस

स्पूतनिक लाईट ही ९ वी कोरोना लस बनली आहे. आतार्यंत ज्या आठ लसींना मंजूरी देण्यात आली त्या आठ लसी दोन डोस असणाऱ्या आहेत. यात स्पूतनिक व्ही, कोविशील्ड, कोवॅक्सिन, कोवोवॅक्स, कोर्बेवॅक्स सह मॉडर्ना, जॉनसन अँड जॉनसन आणि जायडस कॅडिलाची जाय कोव डी या लसींचा समावेश आहे. (Sputnik light)

देशातच होणार उत्पादन

डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजचे सीईओ इरेज इजरायली यांनी सांगितले की, कंपनी भारतात स्पूतनिकचे उत्पादन करण्यासाठी सक्षम झाली आहे. स्पूतनिक लाईटला लस आणि स्पुतनिक व्हीच्या बूस्टर डोसच्या रुपात आणण्यासाठी भारत सरकार सोबत बोलणे सुरु आहे. असही त्यांनी सांगितले.

लस किती आहे प्रभावी?

एका अहवालानूसार स्पूतनिक लाईट कोरोना विरोधात ७८.६-८३.७ टक्के सक्षम आहे. जे दुसऱ्या दोन लसींच्या तुलनेत प्रभावी आहे. ही लस घेतल्यानंतर कोरोना रुग्णांना रुग्णालयात जाण्याची शक्यता ८२.१-८७.६ टक्क्यांपर्यंत कमी होते. स्पूतनिक व्ही आणि स्पूतनिक लाईटमध्ये फरक आहे. सध्या देशात स्पूतनिक व्हीचे दोन डोस दिले जात आहेत. स्पूतनिक लाईटचा एकच डोस दिला जाणार आहे. (Sputnik light)

हेही वाचलत का?

 

Back to top button