भाजप खासदारांसाठी तीन ओळींचा ‘व्हिप’! ८ फेब्रुवारीला सदनात हजर राहण्याचे आदेश | पुढारी

भाजप खासदारांसाठी तीन ओळींचा 'व्हिप'! ८ फेब्रुवारीला सदनात हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  सत्ताधारी भाजप ने पुढील आठवड्यात ८ फेब्रुवारी रोजी सर्व खासदारांना सदनात उपस्थित राहण्यासंबंधीचा तीन ओळींचा ‘व्हिप’ जारी केला आहे. मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रपतींचे अभिभाषणावर चर्चा तसेच धन्यवाद प्रस्ताव पारित करण्यासंबंधी महत्वपूर्ण कामकाज केले जाणार आहे. चर्चेकरीता १२ तासांचा अवधी ठेवण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान देखील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

राज्यसभेचे विद्यमान अर्थसंकल्पाच्या पहिल्या आठवड्यादरम्यान १५ तास १७ मिनिटे कामकाज चालले.पहिल्या आठवड्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर राज्यसभेत आतापर्यंत २६ खासदारांच्या भाषणासह ७ तास ४१ मिनिटे राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ वर येत्या आठवड्यात ११ तास चर्चा करण्यात येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण देखील शुक्रवारी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतील. अर्थसंकल्पाच्या पहिल्या आठवड्यात या प्रमुख कामांवर चर्चा करण्यासाठी २३ तासांहून अधिकचा वेळ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचलं का

Back to top button