पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
रानडुक्कराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचा स्फोट झाल्याने एका सहावर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास दिघी परिसरात उघडकीस आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी आणि तिचे मित्र सकाळी अंगणात खेळत होते. त्यावेळी त्यांनी शिकारीसाठी वापरला जाणारा बॉम्ब सापडला. त्यांनी हा बॉम्ब दगडाने ठेचला. त्यामुळे झालेल्या स्फोटात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोन मुले जखमी झाली आहेत.
या घटनेची माहिती मिळताच दिघी व आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी आणखी काही बॉम्ब मिळून आले आहेत. पोलिसांनी हे बॉम्ब ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे.
हेही वाचलतं का?