Metaverse : काय आहे मेटाव्हर्स?; तुम्ही वास्तविक आणि आभासी जगातील फरक विसरून जाल?

Metaverse : काय आहे मेटाव्हर्स?; तुम्ही वास्तविक आणि आभासी जगातील फरक विसरून जाल?

पुढारी ऑनलाईन डेस्क

Metaverse : आपल्यातील अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय टीव्ही सीरीज ब्लॅक मिरर पाहिली असेल. ही मालिका आपल्याला डिस्टोपियन भविष्य दाखवते; जिथे तंत्रज्ञानाच्या विकासाचा मानवी वर्तनावर काय परिणाम होतो. टीव्ही सीरीजमधील एका एपिसोडमध्ये असे भाग भविष्य दाखवले गेले आहे जिथे माणूस तंत्रज्ञानात अडकतो आणि आभासी आणि वर्तमान जगामधील फरक विसरतो. आपले भविष्य असेच होणार आहे. आम्ही आता मेटाव्हर्सच्या जगात पाऊल ठेवत आहोत. जिथे वर्तमान जगासोबतच आभासी जग असेल. त्यासाठी आपण आज मेटाव्हर्स काय आहे? आणि भविष्यात हे तंत्रज्ञान आल्यानंतर खरंच आपण वास्तवातील जग आणि आभासी जग यातील फरक विसरून जाणार तर नाही ना?. याबाबत माहिती घेणार आहोत.

मेटाव्हर्स नेमकं आहे काय?

मेटाव्हर्स हे इंटरनेटच्या त्या टप्प्याचा विकास आहे; जिथे वास्तवाला आभासी स्वरूप दिले जाईल. या आभासी जगात तुमचा आणि इतर अनेकांचा आभासी अवतार असेल किंवा प्रतिकृती असतील, ज्यांच्याशी आम्ही ३D रुपात संवाद साधू. पण, मेटाव्हर्सच्या या Augmented Reality च्या जगात एकमेकांना आभासी स्वरुपात भेटण्यासाठी, आपल्याकडे व्हीआर (Virtual Reality) हेडसेट असणे आवश्यक आहे. आज, जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या मेटाव्हर्समध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत.

कसे असेल मेटाव्हर्सचे जग?

आज आपण वर्तमान जगात जसे एकमेकांना भेटतो; अशाप्रकारे मेटाव्हर्सच्या जगात आपण संवर्धित वास्तवात (Augmented Reality) एकमेकांना भेटू शकणार आहोत. या आभासी जगात आपला आणि आपल्या मित्रांचा आभासी स्वरुपात ३D अवतार (Avatars) असेल. त्यांच्याबरोबर आपण Metaverse मध्ये काहीही करू शकू, जे आपण वर्तमान जगात करू शकतो. मेटाव्हर्सवर आपण आपल्या मित्रांसोबत डिस्कोत धमाल करु शकतो. त्यांच्यासोबत आपण खेळाचा आनंद लुटू शकतो. चित्रपट पाहू शकतो. पण हे सगळे करण्यासाठी आपल्याकडे वीआर बॉक्स असणे गरजेचे आहे.

मेटाव्हर्स बनेल जगातील सर्वांत मोठा बिझनेस प्लॅटफॉर्म

मेटाव्हर्सचे (Metaverse) जग आभासी असेल. संवर्धित वास्तवाच्या या जगात आपल्या सर्वांची आभासी प्रतिकृती असेल. आज गेमिंगच्या जगात ज्या प्रकारे आपल्या कॅरक्टरसाठी उपकरणे आणि भिन्न कपडे खरेदी करतो. त्याचप्रकारे मेटाव्हर्सच्या जगात लोक त्यांचे कपडे, शूज आणि हेयरस्टाइलसाठी पैसे खर्च करतील. त्याचवेळी मेटाव्हर्सवर हे लोकदेखील हजर असतील, जे लोकांच्या इतर डिजिटल पर्यांयावर कपडे विकण्याची, हेयरस्टाइल संबंधित सेवा देतील. भविष्यात व्यावसायांसाठी Metavers लोकांसाठी एक मोठा पर्याय ठरणार आहे.

कपडे, चपलांचे अनेक मोठे ब्रँड्स मेटाव्हर्सच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी नियोजन करत आहेत. लवकरच त्यांचे व्हर्च्युअल शॉप या प्लॅटफॉर्मवर येतील. मेटाव्हर्सवर या वस्तू आपण एनएफटी (Non Fungible Tokens) च्या मदतीने खरेदी करु शकणार आहोत. एकीकडे अनेक लोक या प्लॅटफॉर्मवरील सेवांचा लाभ घेतील. दुसरीकडे, अनेक लोक या सेवा देऊन भरपूर पैसे कमावतील.

मेटाव्हर्सवर आपण आपल्या डिजीटल अवतारासोबतच (Avatars) बिझनेस मीटिंगचा भाग बनणार आहोत. तुम्ही आणि तुमचे सहकारी यावर आभासी स्वरुपात असतील. तुम्ही त्यांच्यासोबत मिटिंग घेऊ शकता. त्याचसोबत तुम्ही मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मवर तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत कामदेखील करु शकणार आहात. मेटाव्हर्सवर काम करण्याचा एक वेगळाच अनुभव असेल. या Augmented रियलिटी जगात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत डोंगरांवर, नद्या आणि अन्य आभासी निसर्गरम्य ठिकाणी काम करण्याचा अनुभव घेऊ शकणार आहात.

…तर शाळेत जावे लागणार नाही

याशिवास मेटाव्हर्स आल्यानंतर शिक्षण क्षेत्र पूर्णपणे बदलून जाईल. यादरम्यान शाळेत जाण्याची गरजदेखील राहणार नाही. मुले एआर अथवा वीआर बॉक्स त्यांच्या डोळ्यावर लावून शाळेचा अनुभव घेऊ शकतील. भविष्यातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये बदल करायला हवा. त्यांना त्यांच्या शाळेची हुबेहूब प्रतिकृती मेटाव्हर्सवर आणावी लागेल. आज अनेक मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म, न्यूज एजन्सींज, कपड्यांचे मोठे ब्रँड्स आदी आपल्या सेवा मेटाव्हर्सवर आणण्याची पूर्ण तयारी करत आहेत.

फेसबुक की मायक्रोसॉफ्ट, मेटाव्हर्सवर कोण बाजी मारणार?

मायक्रोसॉफ्ट मेटाव्हर्सच्या जगात बाजी मारु शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट वेगाने काम करत आहे. मेटाव्हर्सच्या जगात मायक्रोसॉफ्टचे मेश प्लॅटफॉर्म क्रांती घडवू शकते. मायक्रोसॉफ्टने २०२१ मध्ये इग्नाइट इव्हेंटमध्ये हे प्लॅटफॉर्म लॉन्च केले होते. मेश अॅपवर तुम्हाला जबरदस्त होलोग्राफिक रेंडरिंग पाहायला मिळते. आतापर्यंत या तंत्रज्ञानांपर्यंत कोणी पोहचू शकलेले नाही.

फेसबुकदेखील मेटाव्हर्सच्या जगात पाऊल ठेवत आहे. या क्षेत्रात फेसबुक मोठी गुंतवणूक करत आहे. सध्या मेटाव्हर्सच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट सर्वांत पुढे आहे. अशा स्थितीत सोशल मीडियावर फेसबुकची जी मक्तेदारी आहे ती मेटाव्हर्सच्या आगमनानंतर मायक्रोसॉफ्टकडे जाऊ शकते.

मेटाव्हर्सचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल?

मेटाव्हर्स आल्यानंतर माणूस स्वतःपुरता मर्यादित राहू लागेल. लोक प्रत्यक्षात भेटण्याएेवजी आभासी स्वरुपात भेटतील. अशावेळी वास्तव जीवनात माणसाचा बहुतांश वेळ एकाकी जाईल. जेव्हा मेटाव्हर्स येईल तेव्हा माणूस वास्तविक आणि आभासी जगामध्ये फरक करण्यास विसरेल. बहुतेक वेळा एकटा राहिल्याने तो नैराश्य आणि विविध मानसिक आजारांना बळी पडू शकतो, अशीही भीती आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : श्रीवल्लीची भन्नाट मराठी व्हर्जन्स ऐकलीत का? | Marathi versions of Srivalli song | Pushpa

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news