पुणे : रामदास आखाडे यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी | पुढारी

पुणे : रामदास आखाडे यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे (वय ४१) यांची अठ्ठेचाळीस तासांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. रामदास आखाडे यांच्यावर रविवारी हल्ला झाला होता.

रामदास आखाडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि. २०) पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास निधन झाले आहे. या अनुचित प्रकाराने एका यशस्वी उद्योजकाची जीवनयात्रा संपली. या घटनेने नागरिकांत प्रचंड हळहळ व संताप व्यक्त होत आहे.

रविवारी (दि. १८) रात्री पावणे नऊच्या सुमारास दोघा हल्लेखोरांपैकी एकाने हॉटेलमध्ये प्रवेश करुन तलवारीने रामदास आखाडेंवर जीवघेणा हल्ला केला होता.

अधिक वाचा : 

डोक्यात गंभीररीत्या खोलवर वार झाल्याने त्यांची मृत्यूची झुंज सुरू होती.

पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलची उभारणी रामदास आखाडे यांनी केली होती.

पुणे ते सोलापूरपर्यंत सर्वांधिक ग्राहकांची पसंतीला उतरलेलं अशी ख्याती या हॉटेलची होती.

अधिक वाचा :

पुण्यातील रुग्णालयात सर्व प्रकारची प्रयत्नांची शिकस्त करुन त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न रुग्णालयाने केला होता.

मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही.

अधिक वाचा : 

दरम्यान रामदास आखाडे यांचे मूळचे गाव दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी हे असून शेती हा मूळ व्यवसाय आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.

व्यावसायिक स्पर्धा जीवावर बेतली

रामदास आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या हल्ल्यावरुन तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या हल्ल्यामागील मुख्य आरोपी अद्याप फरारी आहे. व्यवसायातील स्पर्धेतून हा हल्ला घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Back to top button