BSF jawan : बीएसएफ जवानाला सलाम… बर्फात ४० सेकंदात ४७ पुशअप्‍स ( व्हिडिओ व्हायरल ) | पुढारी

BSF jawan : बीएसएफ जवानाला सलाम... बर्फात ४० सेकंदात ४७ पुशअप्‍स ( व्हिडिओ व्हायरल )

पुढारी ऑनलाईन डेस्क : (BSF jawan)भारतीय जवान फिटनेसमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. सध्या काश्‍मीरमध्‍ये बर्फवृष्टी सुरु आहे. या वातावरणातही जवानांच्या उत्साहाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता एक बीएसएफचा जवान बर्फवृष्टीतही ४० सेकंदात ४७ पुशअप्स मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने अनेक नेटिझन्सची मन जिंकली आहेत. नेटीझम्सनी या बीएसएफ जवानाला सलाम करत आहेत. व्हिडिओमध्ये बीएसएफचा जवान हिमवृष्टीतही जमिनीवर पुश अप करताना दिसत आहे.(BSF jawan)

या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये बीएसएफ जवान हिमवृष्टीत काश्मीरमध्ये ४० सेकंदात ४७ पुशअप्‍स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) च्या अधिकृत ट्विटर हँडलवर “४० सेकंद” या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे.

याच ट्विटर थ्रेडमध्ये, बीएसएफने बर्फात एका हाताने पुशअप्‍स करत असलेल्या जवानाचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर जवानांच्या पराक्रमाचे कौतुक केलं आहे.(BSF jawan) या व्हिडिओ नंतर आणखी एक ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत आणखी एक बीएसएफ जवान बर्फात एका हाताने पुशअप्‍स करताना दिसत होता. या हवामानात सर्व देशवासीयांना सुरक्षा देण्यासोबतच BSF जवान लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

बोनियार तहसीलमधील नियंत्रण रेषेजवळ (LOC) जम्मू आणि काश्मीरच्या एका गावातून एका गर्भवती महिलेचे आपत्कालीन स्थलांतर केल्याबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक करण्यात आले हाेते. ८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता, बोनियार तहसीलमधील एलओसीजवळील एका गावातील भारतीय लष्कराच्या चौकीला स्थानिक नागरिकांकडून कॉल आला. गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय मदत गरज असल्‍याची विनंती केली होती. प्रचंड हिमवृष्टी आणि रस्त्यांची खराब परिस्थिती असतानाही लष्कराने त्या महिलेला बोनियार येथील प्राथमिक आरोग्य सेवा (PHC) केंद्रात हलवले हाेते .(BSF jawan)

हेही वाचलं का?

Back to top button