उत्तर प्रदेश : कोण आहेत हैदर अली खान ? ज्यांना भाजप पुरस्कृत आघाडीकडून उमेदवारी | पुढारी

उत्तर प्रदेश : कोण आहेत हैदर अली खान ? ज्यांना भाजप पुरस्कृत आघाडीकडून उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क 

भारतीय जनता पार्टीच्या अगुलाई येथील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा भाग असलेल्या अपना दल (एस) कडून रामपूर येथील स्वार मतदारसंघातून हैदर अली यांना उमेदवारी दिली गेली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत हैदर आजम खान यांच्या मुलाच्या विरोधात ही उमेदवारी दिली गेली आहे.

२०१४ नंतर पहिल्यांदाच भाजप आघाडीकडून एका मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे. रामपूरमध्ये या दोन मुस्लीम युवकांमधील निवडणूक लक्षणीय ठरणार आहे. नुकत्याच जामिनावर बाहेर पडलेल्या अब्दुला आजम यांना समाजवादी पार्टीने अजून एकदा उमेदवारी दिली गेली आहे. तर सध्या हैदर अली यांची मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.

हैदर अली हे काँग्रेसचे नेते नवाब काजिम अली खान यांचे पुत्र आहेत. काजिम खान यांना २०१७ मध्ये स्वार मतदारसंघातून बसपाकडून निवडणूक लढवली होती, पण अब्दुला आजम यांनी त्यांचा ६५ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळेस काजीम खान स्वत: काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. सपाकडून आजम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचलत का?

Back to top button