adani-ambani : अदानी अंबानींचा गुजरातसाठी मास्टर प्लॅन ! लाखो गुजरातींना रोजगार मिळणार | पुढारी

adani-ambani : अदानी अंबानींचा गुजरातसाठी मास्टर प्लॅन ! लाखो गुजरातींना रोजगार मिळणार

गांधीनगर; पुढारी ऑनलाईन

रिलायन्स ग्रूपचे चेअरमन आणि आशियाचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहेत. अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी(आरआयएल) येत्या १० ते १५ वर्षांच्या दरम्यान, गुजरात राज्यात हरित उर्जा आणि अन्य योजनांवर तब्बल ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. (adani-ambani) तर अदानी समूहाने गुजरातमध्ये एक एकीकृत स्टील प्लांटसाठी आणि अन्य व्यवसायासाठी दक्षिण कोरियाई कंपनी पॉस्कोसोबत पाच अब्ज डॉलरचा प्राथमिक करार केला आहे. (adani-ambani)

रिलायन्स इंडस्ट्रीजची घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, कंपनी गुजरात राज्यात १ लाख मेगावॅटची रिन्यूएबल एनर्जीपॉवर प्लांट आणि ग्रीन हायड्रोजन योजनेच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. याशिवाय कंपनी सौर फोटोवोल्टिक मॉड्युल, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलाइजर, ऊर्जा भंडारण बॅटरी आणि फ्यूअल सेलच्या उत्पादनासाठी ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. तसेच पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या योजना आणि नव्या प्रकल्पांमध्ये २५ हजार कोटी रुपये गुंतवेल.

राज्यात १० लाख रोजगार निर्मिती

याशिवाय रिलायन्सने जियोचा दूरसंचार नेटवर्कला 5G मध्ये बदलण्यासाठी तीन ते पाच वर्षामध्ये ७,५०० कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रस्ताव दिलाय. आणि रिलायन्स रिटेलमध्ये पुढील पाच वर्षांच्या काळात ३ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

कंपनीच्या एका स्टेटमेंट मध्ये म्हटलंय-“वायब्रेंट गुजरात संमेलन २०२२ साठी प्रचार-प्रसार कार्यक्रमादरम्यान आरआयएलने गुजरात सरकारसोबत एकूण ५.९५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करारावर सह्या केल्या आहेत. या योजनांतून राज्यात जवळपास १० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”

कंपनीने गुजरात सरकारसोबत कच्छ, बनासकांठा आणि धोलेरामध्ये १ लाख मेगावॅट क्षमतेची नवी ऊर्जा योजनेसाठी जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पहा व्हिडिओ – श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी केले ‘एक कोटी साठ लाख’ चे दान

Back to top button