Indian passport : आता ५९ देशांत व्हिसा फ्री प्रवास करता येणार - पुढारी

Indian passport : आता ५९ देशांत व्हिसा फ्री प्रवास करता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार, भारताने 2022 सालासाठी पासपोर्ट पॉवर रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. या क्रमवारीत भारत गेल्या वर्षीच्या 90 व्या स्थानावरून सात स्थानांनी वर चढून 83 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारताचा पासपोर्ट पुर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली बनला आहे. यामुळे भारतीय पासपोर्टधारकांना आता जगभरातील 59 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करता येणार आहे.

यामध्ये ओमानपासून इराणपर्यंतचा समावेश आहे. 2006 पासून भारताने जवळपास 35 देश जोडले आहेत. आशियातील ज्या देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करता येतो त्यात भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड यांचा समावेश होतो.
पाकिस्तानी पासपोर्टला सलग तिसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी चौथा सर्वात वाईट पासपोर्ट म्हणून स्थान देण्यात आले आहे. सध्या एकूण क्रमवारीत पाकिस्तानचा 108 वा क्रमांक लागतो.

जपान आणि सिंगापूरच्या पासपोर्टची अनुक्रमणिका सर्वात जास्त सक्षम आहे. त्यांच्या पासपोर्टधारकांना 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करता येतो. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्व पासपोर्टची क्रमवारी लावते जेथे त्यांचे धारक पूर्वीशिवाय प्रवास करू शकतात.

हेही वाचा

Back to top button