ठाणे : खारेगाव उड्डाणपुलाच्या उद्घाटनात शिवसेना- राष्ट्रवादीची घोषणाबाजी | पुढारी

ठाणे : खारेगाव उड्डाणपुलाच्या उद्घाटनात शिवसेना- राष्ट्रवादीची घोषणाबाजी

ठाणे, पुढारी वृत्तसेवा

खारेगाव उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यावरून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडत आहे.

या दरम्यान या पुलाचा पाठपुरावा आम्हीच केला होता असा दावा करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची घोषणा केली होती. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याने दोन्ही पक्षाच कार्यकर्ते सामोरा- समोर आले असून जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत असल्याने उद्घाटन ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन दोन्ही पक्षाचा कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button