Poisonous Liquor : बिहारमध्‍ये विषारी दारु पिल्‍याने पाच जणांचा मृत्‍यू : नातेवाईकांचा आराेप

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

नालंदा : पुढारी ऑनलाईन
बिहारमधील नालंदा जिल्‍ह्यात विषारी दारु ( Poisonous Liquor ) पिल्‍याने पाच जणांचा मृत्‍यू झाला आहे. मृतांच्‍या नातेवाईकांनी विषारी दारु प्राशन केल्‍यानेच मृत्‍यू झाल्‍याचा दावा केला आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेले नाही.

नालंदा जिल्‍ह्यातील सोहसराय पोलिस ठाण्‍याच्‍या परिसरातील छोटी पहाडी आणि पहाड तल्‍ली मोहल्‍ला येथे एकाचवेळी पाच जणांचा मृत्‍यहू झाला. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे.

यापूर्वीही बिहारमधील सिवान, गोपलगंज, बेतिया, मुजफ्‍फरपूर, भागलपूर आदी जिल्‍ह्यांमध्‍ये विषारी दारु ( Poisonous Liquor ) प्राशन केल्‍याने अनेकांचा मृत्‍यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मागील सहा दिवसांमध्‍ये राज्‍यात विषारी दारुने ४० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे.

मद्‍य प्राशन, विक्री आणि उत्‍पादनावर बिहारमध्‍ये बंदी आहे. राज्‍यात विषारी दारुची विक्री करण्‍यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांनी दिले हाेते. तसेच विषारी दारुला आश्रय देणार्‍या अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. आता नालंदामध्‍ये पुन्‍हा एकदा विषारी दारुने आणखी ५ जणांचा बळी घेतल्‍याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news