Center Vs State : महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा नाही; केंद्राचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा नाही, असे स्पष्टीकरण शुक्रवारी केंद्र सरकारकडून देण्यात आले. राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे २४ लाखांहून अधिक डोस शिल्लक आहेत. शुक्रवारी राज्याला ६.३५ लाख अतिरिक्त डोस प्राप्त झाल्या आहेत. (Center Vs State)
कोव्हिनवर उपलब्ध असलेल्या राज्याच्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनूसार १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यासाठी आणि खबरदारीचा डोस देण्यासाठी महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर २.९४ लाख डोस एवढा आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यासाठी पुढील १० दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे,असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Center Vs State)
शिवाय राज्याकडे कोविशील्ड या लसीच्या वापर न झालेल्या आणि शिल्लक असलेल्या सुमारे १.२४ कोटी डोस आहेत. त्यांचा दिवसाला सरासरी ३.५७ लाख डोसचा वापर विचारात घेतला, तर हा साठा लाभार्थींना लसी देण्यासाठी ३० दिवसांपेक्षाही जास्त दिवस पुरेसा ठरू शकतो. काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही आणि महाराष्ट्रात शिल्लक असलेल्या साठ्याचे आणि वापर न झालेल्या कोरोना लसींच्या डोसचे वास्तविक चित्र प्रदर्शित करत नाही, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
हे वाचलंत का?
- कपिल शर्मा या कॉमेडियनवर येतोय बायोपिक
- टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार “का रं देवा” चित्रपटात
- धक्कादायक! दापोलीत ३ वृद्ध महिलांचा जळून मृत्यू; कारण अस्पष्ट