पुढारी ऑनलाइन डेस्क
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक. ( Virat Kohli captaincy ) त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मटमध्ये संघाचे नेतृत्व केलं. त्याने विदेशीत टीम इंडियाला अभूतपूर्व यशही मिळवून दिलं. मात्र मागील काही दिवस विराट आपला नैसर्गिक खेळ करण्यासाठी चाचपडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे टी -२० आणि वनडे संघाचे कर्णधारपदावरुनत्याला हटविण्यात आले. कसोटीचे त्याच्याकडील नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर करण्याची विराटला संधी होती. दक्षिण दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसर्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने कर्णधारपदाला साजेसी कामगिरीही केली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर भारतील फलंदाजांची भंबेरी उडवली. वर्षाच्या सुरुवातीलाचा ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर करण्याचे विराटसह टीम इंडियाचे स्वप्न भंगले आहे. आता यावर्षी कर्णधार म्हणून विराट कोहली आणि भारतीय संघासमोर असणार्या आव्हानांची माहिती घेवूया…
यावर्षी भारतीय क्रिकेट संघ हा सर्वाधिक मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून विराटची ( Virat Kohli captaincy ) खेळी पाहण्याची संधी कमीच असेल. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. आता रोहन शर्मा याच्या अनुपस्थितीत केएल राहुल यांच्याकडे नेतृत्वाची धुरा असेल.
दक्षिण आफ्रिका दौर्यानंतर फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिज संघ भारतात तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळेल. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघ श्रीलंकेचा मुकाबला करेल. श्रीलंकेचा संघ भारतात दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. कसोटीचे नेतृत्व विराट कोहलीकडेच राहणार आहे. तर टी-२० मालिकेत रोहित कर्णधार असेल.
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौर्यानंतर भारतीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये आपली कामगिरी दाखवतील. यानंतर दक्षिण आफ्रिका संघ भारत दौर्यावर येणार आहे. ९ ते १९ जून असा हा दौरा असेल. यामध्ये दक्षिण आफ्रिका संघ भारताविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळले.
दक्षिण आफ्रिका संघाबरोबरील टी-२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करेल. या दौर्यात एक कसोटी, तीन टी-२० आणि तीन वनडे सामने खेळले जातील. २०२१मध्ये भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिका खेळली होती. कोरोना महामारीमुळे या मालिकेतील एक सामना स्थगित करण्यात आला होता. यावर्षी तो खेळवला जाईल. या मालिकेत दोन सामने भारताने तर एक सामना इंग्लंडने जिंकला आहे. त्यामुळे यावर्षी केवळ तीन कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाची धुरा विराटकडे असेल.
इंग्लंड दौर्यावर परतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात टीम इंडिया आशिया कपसाठी मैदानात उतरले. मात्र अद्याप आशिया कपचे वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२२मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्याच्या निर्धारानेच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे; पण २००७मध्ये पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केला होता. मात्र यानंतर भारतीय संघ या फॉर्मटमधील विश्वचषक जिंकू शकला नाही, हे वास्तव आहे.
हेही वाचलं का?