अफवांवर विश्वास ठेवू नका : नागपूरकरांना उपमुख्‍यमंत्री फडणवीसांचे आवाहन

 Nagpur Rain Update
Nagpur Rain Update
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरमध्ये शुक्रवारी मध्‍यरात्री मुसळधार  पावसाने हाहा:कार माजवला. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. रस्‍त्‍यांना नदीचे स्‍वरूप आले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्‍बल ५ फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. पुरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत आवाहन केले आहे की,"कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत." ( Nagpur Rain Update )

संबधित बातम्या

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्टी

नागपुरमध्ये मध्यरात्री (दि.२३)  पावसाने हाहाकार माजवला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्‍थळी हलवण्यात येत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्‍याने नागपूरकरांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सिताबर्डी भागालाही पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्‍त्‍यांना नदीचे स्‍वरूप आले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्‍बल ५ फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. पुरपरिस्थिती पाहता शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Nagpur Rain Update : अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरू नका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत चाअसे आवाहन केले आहे. व पूरपरिस्थिती बाबत अपडेट दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

  • नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहे.
  • एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
  • एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.
  • मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
  • नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत.
  • अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे.
  • अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत.
  • शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
  • गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
  • कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका.
  • वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news