Nagpur Rain Update : नागपूरमधील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा ; फडणवीसांचे आदेश | पुढारी

Nagpur Rain Update : नागपूरमधील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा ; फडणवीसांचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्‍त्‍यांना नदीचे स्‍वरूप आले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्‍बल ५ फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. पुरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात अडकलेल्‍या नागरिकांना तात्‍काळ मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (Nagpur Rain Update)

Nagpur Rain Update : पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे,

“नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्टी

नागपुरमध्ये मध्यरात्री (दि.२३)  पावसाने हाहा:कार माजवला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षीत स्‍थळी हलवण्यात येत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्‍याने नागपूरकरांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सिताबर्डी भागालाही पुराचा फटका बसला आहे.नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्‍त्‍यांना नदीचे स्‍वरूप आले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्‍बल ५ फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. पुरपरिस्थिती पाहता शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button