सांगली : बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने महिलेचा गळा दाबून केला खून

सांगली : बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने महिलेचा गळा दाबून केला खून
Published on
Updated on

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील निर्मला अजय उर्फ खंडू चव्हाण (वय ३०) हिचा खून केल्याची कबूली संशयित योगेश नंदकुमार भोसले (वय ३२ रा.डबास गल्ली तासगाव) याने दिली आहे. निर्मला यांनी संशयित योगेश याच्‍याविराेधात बलात्काराची फिर्याद दिली हाेती. पोलिसांनी त्याला अटक केली असून,  न्यायालयाने त्याला दि, ७ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निर्मला यांचा मृतदेह दि, ३० नोव्हेंबर रोजी वासुबे हद्दीतील आरफळ कालव्या जवळ आढळून आला होता. याबाबत निर्मला यांच्‍या आई लक्ष्मीबाई तानाजी शिरतोडे (रा.वासुबे) यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली होती.

निर्मला दोन लहान मुलासह तासगावामध्‍ये राहत हाेत्‍या. संशयित योगेश भोसले हा त्‍यांच्‍या घरी वारंवार येत  असे. निर्मला व योगेश यांच्यात अनेकवेळा वादावादी झाली होती. निर्मला यांनी २०१५ साली संशयित योगेशविराेधात बलात्काराची फिर्याद दिली हाेती. हा खटला सांगली  न्यायालयात सुरू आहे.

तक्रार मागे घेण्‍यासाठी याेगेश हा निर्मला यांच्‍यावर दबाव आणत हाेता. २९ नोव्हेंबर रोजी दोघे सांगली येथे एकत्र आले. त्यावेळी संशयित याच्या पिकअप गाडीत ( एम एच ०९ सि यु ४२४५) बसले असता त्या दोघांत याच कारणावरून वाद सुरू झाला आणि दोघांतील वाद वाढत गेला.

याेगेश याने दोरीचे निर्मला यांचा गळा आवळला. त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. योगेशने वासुबे हद्दीतील आरफळ कालव्या शेजारी मृतदेह फेकला हाेता.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे , पोलीस निरीक्षक सजीव झाडे यानी भेट देऊन तपासला गती दिली. गुन्हा उघडकीस आणण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग धेंड़े, नितीन केराम ,नामदेव तरडे, सदीप गुरव, पोलीस सतीश लाटणे, सोमनाथ गुंडे, सागर लवटे, विलास भोसले, समीर आवटे, सतीश खोत, हणमंत गवळी, विनोद सकटे, दत्तात्रय जाधव , अशोक सूर्यवंशी, प्रकाश पाटील ,कॅप्टन गुंडेवाडे , जितेंद्र चव्हाण , महादेव हसबे, महेश मासाळ यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news