Nawab Malik vs Wankhede : नवाब मलिक हाजिर हो ! वाशीम न्यायालयात हजर राहण्याचे आदेश | पुढारी

Nawab Malik vs Wankhede : नवाब मलिक हाजिर हो ! वाशीम न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

वाशिम; पुढारी वृत्तसेवा

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 13 डिसेंबर रोजी वाशीम जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी 4 डिसेंबर रोजी दिले आहेत. मुंबई एनसीबी संचालक प्रमुख समीर वानखडे यांचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे विरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत वाशीम येथील न्यायालयामध्ये एका याचिकेद्वारे मागणी केली होती. (Nawab Malik vs Wankhede)

याबाबत याचिकाकर्ते संजय वानखडे यांचे वतीने, जेष्ठ विधीज्ञ उदय देशमुख यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तीवाद केला. तेव्हा, जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ना. नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्यासाठी 13 डिसेंबर रोजी वाशीम न्यायालयात हजर राहावे, असा आदेश दिला आहे. (Nawab Malik vs Wankhede)

या प्रकरणात नवाब मलिक त्यांची बाजू मांडण्यासाठी वाशीम न्यायालयात येणार असल्यामुळे या प्रकरणाकडे जनतेचे लक्ष लागले आहे. समीर वानखडे यांनी अंमली पदार्थ माफीयांवर धडक कारवाई करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात सिनेअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. तेव्हापासून नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमातून समीर वानखडे यांचेवर निशाणा साधत त्यांचेवर उलट सुलट आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

Back to top button