माघी वारी : पंढरीत फुलला भक्तीचा मळा, तीन लाखांहून अधिक भाविक दाखल

माघी वारी : पंढरीत फुलला भक्तीचा मळा, तीन लाखांहून अधिक भाविक दाखल
Published on
Updated on

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या नंतर प्रथमच भरलेल्या माघी यात्रा एकादशीला तीन लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली आहे. हरिनामाच्या जयघोषात भाविक तल्लीन झाले आहेत. चंद्रभागा स्नान, मुख दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमूळे मंदिर परिसर गजबजला असून भक्तीचा मळा फुलला आहे.

दरम्यान, माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पहाटे संपन्न झाली.

माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. मुख दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना माघी एकादशी निमित्त श्रींच्या गाभार्‍यात व मंदीरात करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या आरासीचेही दर्शन घडत आहे. यामध्ये झेंडू, शेवंती जरबेरा अशा विविध जातींच्या एकूण 1 टन फुलांची मनमोहक आरास करण्यात आली आहे.

माघी एकादशीला राज्यातील इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व मंदिर समितीच्यावतीने वारकरी व भाविकांसाठी आवश्यक उपाययोजना तसेच सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांनी मास्क बंधनकारक केले आहे. रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधेबरोबरच 65 एकर, नदीपात्र, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

माधी एकादशी निमित्त भाविकांनी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले जाते. एकादशी निमित्त दर्शन रांग पत्राशेड पुढे पोहचली होती. दर्शन रांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुख दर्शनासाठी सुमारे सहा ते सात तास वेळ लागत आहे. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, 65 एकरातील भक्तीसागरात भाविक टाळ मृदूंगाच्या जयघोषात तल्लीन झाले आहेत. मठ, धार्मिक संस्थाने, धर्मशाळा आदी ठिकाणी भाविक भजन, किर्तन व प्रवचनात दंग असल्याने पंढरी नगरी भक्तीमय झाली आहे.

यावेळी मंदिर समितीच्या दिनदर्शिकेचे व डायरीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सह – अध्यक्ष ह. भ. प गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुशास्त्री भगरे, शकुतंला नडगिरे, माधवी निगडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणीची नित्यपुजा संपन्न

माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक संपन्न झाली. असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

एकादशी निमित्‍त करण्यात आलेल्‍या सुविधा

  • एकादशी दिवशी सकाळी दर्शन रांग पत्राशेडमध्ये दाखल
  • मुख दर्शनास 6 ते 7 तासाचा वेळ लागत आहे
  • 3 लाखांवर भाविकांच्या उपस्थितीने पंढरी गजबजली
  • भाविकांच्या सेवासाठी आपतकालीन व्यवस्था कार्यान्वित
  • तीर्थक्षेत्र पोलीस संकल्पनेव्दारे भाविकांची सेवा
  •  मंदिरात दर्शनाला जाताना मास्क बंधनकारक
  • कोरोनानंतर प्रथम फुलला भक्तीचा मळा
  • प्रासादिक साहित्य खरेदीस भाविकांची पसंती

हे ही वाचलं का 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news