पुणे : प्रतिपंढरपूर कडूसमध्ये श्री पांडुरंगाचे आगमन | पुढारी

पुणे : प्रतिपंढरपूर कडूसमध्ये श्री पांडुरंगाचे आगमन

कडूस : पुढारी वृत्तसेवा

तंव तेथे नवलवर्तले!आकाश असे विमानी दाखले!
म्हणती मूळपीठ वैकुंठ दोखिले! पुंडलिका सकट!
पंढरीहुनी आले कैसे! पुंडलिक देवसरिसे! ज्ञानदेवासेव नामा असे!
आणि विष्णू भक्त आपार!

टाळ मृदुंगाचा निनाद… ब्रम्हंवृंदांचा मंत्रोच्चार आणि विठ्ठल विठ्ठल असा विठू नामाचा गजर.. एकोबा तुकोबा.. अशा अखंड गजरात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडूस नगरीमध्ये श्री पांडुरंगाचे आगमन झाले. राज्यभरातून आलेल्या हजारो वारकऱ्यांसह भाविकांनी टाळ, मृदुंगाचा निनाद, करीत भक्ती भावाला उधाण आल्याने हरिनामाच्या गजरात कडूस गावचा परिसर अक्षरशः फुलून गेला आहे.

लखीमपूर खिरी हिंसाचार : मुख्‍य आरोपी आशीष मिश्रा याला जामीन

स्वत: तुकोबांनी केली होती विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना

संत गंगाजी बुवा मवाळ हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक मुकुटमणी मानले जातात. संत तुकोबांनीच त्यांना स्वतःजवळच्या प्रासादिक पांडुरंग- राही- रखुमाई मुर्ती आणि सद्गुरु केशव चैतन्य यांच्या पादूका दिल्या आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी स्वतः विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केली असल्याचे पुरावे सापडतात. प्रतिवर्षी येथे माघ शुद्ध दशमी ते पोर्मिणा पर्यंत या काळात प्रासादिक मूर्ती प्रांगणात सिहासनावर आधिष्ठित केल्या जातील. या सहा दिवसांत पंढरीच्या विठूरायाचे वास्तव्य कडूसगावी राहिल. म्हणून तुम्ही उत्सव साजरा करा असे तुकोबांनी सांगितल्याचे बोलले जाते.

महाराष्‍ट्रात सरकार पाडण्‍याची भाषा करणार्‍या भाजप नेत्‍यांना शुभेच्‍छा : संजय राऊत

तुकोबांचा २८ वर्षे सहभाग

संत तुकाराम महाराज २८ वर्षे या उत्सवात सहभागी झाले होते. हातात टाळ घेऊन भजन, किर्तन करत होते. तुकोबांच्या विनंतीनुसारच प्रत्यक्ष पांडुरंग कडूस येथे विश्रांतीसाठी येत असतात. या सहा दिवसांत पंढरपूरच्या विठ्ठलाचे वास्तव्य कडूस मुक्कामी असल्याने पंढरपुरला काकडा आरती होत नाही. याप्रमाणे पाडुंरंग उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाला सुरूवात झाली असून, भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र कडूस येथे येऊन दर्शन घेत आहे.

हॉलीवूडमध्ये दिसणार हे भारतीय कलाकार

संत तुकाराम नगर (कडूस तुकाराम महाराज पादुका मंदिर) येथून वारकऱ्यांनी विणा घेऊन गावात प्रवेश केला. पंचक्रोशीतील भाविकांनी फुलांचा वर्षीवर करत मोठ्या उत्साहाने स्वागत केले. प्रतिपंढरपूर कडूसमध्ये ३७६ वी एकादशी शनिवारी (दि.१२ रोजी) हजारो भाविकांच्या साक्षीने हरिनामाच्या गजरात साजरी होण्यासाठी सज्ज झाली असून, अवघी कडूस प्रतिपंढरी नामगजराने दुमदुमुन गेली आहे.

Back to top button