छत्तीसगडमध्‍ये चकमकीत ‘सीआरपीएफ’चे असिस्‍टंट कमांडर शहीद | पुढारी

छत्तीसगडमध्‍ये चकमकीत 'सीआरपीएफ'चे असिस्‍टंट कमांडर शहीद

रायपूर : पुढारी ऑनलाईन
छतीसगडमधील बिजापूर जिल्‍ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दल ( सीआरपीएफ ) आणि नक्षलवाद्‍यांमध्‍ये चकमक झाली. यामध्‍ये ‘सीआरपीएफ’चे असिस्‍टंट कमांडर एस. बी. तिर्की शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला आहे, अशी माहिती बीजापूरचे पोलीस अधीक्षक कमलोचन कश्‍यप यांनी आज दिली.

छतीसगडमधील बिजापूर जिल्‍ह्यातील उसूर प्रखंड जंगल क्षेत्रातून सीआरपीएफच्‍या १६८ बटालियनचे जवान रस्‍ते सुरक्षा पाहणी करत होते. यावेळी नक्षलवाद्‍यांनी त्‍यांच्‍यावर गोळीबार केला. जवानांनी नक्षलींना चोख प्रत्‍युत्तर दिले, असे बस्‍तर परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.

तिर्की हे मुळचे झारखंडचे आहेत. नक्षलवाद्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात अप्‍पाराव हा जवान जखमी झाला आहे. त्‍याची प्रकती स्‍थिर आहे. या परिसरातील सुरक्षा व्‍यवस्‍थेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. परिसरात शोध मोहिम सुरु असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button