हरनाज संंधू आणि साईशा शिंदे
हरनाज संंधू आणि साईशा शिंदे

साईशा शिंदे : हरनाज संधूला विश्वसुंदरी करण्यात मराठी मुलीचा सुद्धा हात !

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॅटरीना कैफचं लग्न असो वा मिस युनिव्हर्सची स्पर्धा जिंकणारी हरनाज संधू. ज्या मॉडेल, अभिनेत्रींच्या ड्रेसवर शिक्कामोर्तब झालाय तो मराठमोळ्या साईशा शिंदे हिचा. लारा दत्तानंतर भारताला २१ वर्षांनी मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून देणाऱ्या हरनाज संधूचा ग्रँड फिनालेतील ड्रेस या मराठमोळ्या ट्रान्सजेंडर साईशा शिंदे हिने डिझाईन केला होता.

हरनाज संधू
हरनाज संधू

मिस युनिव्हर्स २०२१ च्या स्पर्धेतील ग्रँड फिनालेमध्ये हरनाजने स्टनिंग सिल्व्हर गाऊन परिधान केला होता.ज्यावेळी तिच्या शिरपेचात मिस युनिव्हर्सचा मुकूट घातला जात होता, त्यावेळी तिने साईशाने डिझाईन केलेला सुंदर गाऊन परिधान केला होता. फिकट चाॅकलेटी रंगात हलकिशी डिझाईन असलेला हा गाऊन इतर सर्व प्रसिस्पर्धींच्या ड्रेसच्या तुलनेत उठावदार दिसत होता. डिप गळा असलेला हा गाऊन बॉडी फिटिंग होता. सुंदर नक्षीकाम असलेला हा ड्रेस ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार ठरला.

साईशा शिंदे
साईशा शिंदे

साईशाने इन्स्टाग्रामवर हरमाज संधूचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तिने डिझाईन केलेला फोटो दिसतोय. याचसोबत तिने कॅप्शन लिहिलीय की- 'आम्ही करून दाखवलं.' साईशा म्हणाली, आम्ही या वर्षाच्या सुरुवातीपासूनचं ड्रेस तयार करायला घेतला होता. मुळचा स्वप्नील शिंदे असणारा तरूण लिंगबदल केल्यानंतर साईशा शिंदे बनली होती.

साईशा शिंदे
साईशा शिंदे

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news