Zaara Yesmin : युजवेंद्र चहलशी लाइव्ह चॅट करणाऱ्या जारानं वाढवलं तापमान

model zara yesmin
model zara yesmin
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय क्रिकेट टीमचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलसोबत लाइव्ह चॅट करणारी अभिनेत्री जारा यस्मीन (Zaara Yesmin) चर्चेत आहे. युजवेंद्र चहलने गेल्यावर्षी यस्मीनशी इन्स्टग्रामवर लाइव्ह चॅट केलं होतं. तुम्हाला माहितीये का, यस्मीन खूप बोल्ड आणि सुंदरही आहे. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही कमेंट करायला विसरणार नाही. नुकताच जारा यस्मीनने (Zaara Yesmin) आपले काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.. तिच्या या फोटोंनी इन्स्टाग्रामचं तापमान वाढवलं आहे.

काही महिन्यांपूर्वी जाराने एक म्युझिक अल्बम 'कांधे का तिल' केला होता. यातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली होती. तिच्यासोबत अल्बममध्ये सलमान युसूफ खान होता. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या म्युझिक अल्बममध्ये जारा खूप क्‍यूट आणि सुंदर दिसत होती.

याशिवाय तिने पंजाबी गायक गुरू रंधावासोबतही काम केलंय. जारा यस्मीन सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव असते. जाराने २०१६ मध्ये फेमिना मिस दिवाचा किताब जिंकला आहे.

इन्स्टाग्रामवर तिचे १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.

आसाममध्ये ८ जानेवारी, १९९४ रोजी तिचा जन्म झाला. तिचे संपूर्ण शिक्षण दिल्‍लीत झालं. तिने नोएडा शारदामधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री घेतलीय. शिक्षण घेता घेता जाराने आपना मॉडलिंगचे करिअर सुरू केले होते.

जारा ३० हून अधिक ब्रँडच्या प्रमोशन प्रोग्रॅममध्ये सहभागी झालीय. जारा फॅशल डिझायनर पायल चड्ढा, तरुण ताहिलियानी, पायल सिंघलसह फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती.

जारा इंटप्रेन्‍योरदेखील आहे. तिची स्वत:ची एक सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. तिचं स्वत:चं क्लॉथ ब्रँड प्रिटी रॅकदेखील आहे. तिचे बुटीकदेखील आहेत.

सोशल मीडियावर जारा आपले हॉट फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते.

जाराने आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केलंय.

फलक सब्बीर यांच्या पंजाबी गाण्यात 'एक बार'मधून तिने २०१६ मध्ये करिअरची सुरूवात केली होती.

वडाली ब्रदर्स, प्रीत हरपाल, मास्‍टर सलीम, गुरु रंधावा, दर्शन रावलसह अन्‍य गायकांसोबत जाराने काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ????? ?????? ? (@zaarayesmin)

 

View this post on Instagram

 

A post shared by ????? ?????? ? (@zaarayesmin)

 

View this post on Instagram

 

A post shared by ????? ?????? ? (@zaarayesmin)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news