Ankita -Vicky wedding : लग्न अंकिताचं, हवा कंगनाची! निळ्या लहंग्यात भाव खाऊन गेली | पुढारी

Ankita -Vicky wedding : लग्न अंकिताचं, हवा कंगनाची! निळ्या लहंग्यात भाव खाऊन गेली

मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन ( Ankita – Vicky wedding ) दोघेजण आज विवाह बंधनात अडकले आहेत. याआधी तिच्या विवाह सोहळ्यातील हळदी आणि मेंहदीचा कार्यक्रम पार पडला. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. तर सध्या या विवाहातील संगीत सोहळ्यात वादग्रस्त आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सहभागी झाली आहे. यातील खास म्हणजे. कंगनाच्या निळ्या रंगाचा लेंहग्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतेच कंगना राणावतने आपल्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत कंगनाने हेवी एम्ब्रॉयडरी असलेला निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यावर तिने स्टेटमेंट नेकलेस, मांगपट्टी आणि मांगटिका यासारखे दागिन्यांचा वापर करत आपला लूक पुर्ण केला आहे. या सुंदर लूकसोबत कंगना नुकतेच अंकिता लोखंडे आणि विक्की जैनच्या ( Ankita – Vicky wedding ) लग्नाच्या संगीत सेरेमनी कार्यक्रमात पोहोचली.

अंकिता आणि विक्कीने आपल्या विवाह सोहळ्यातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी कॉमेंन्टचा पाउस पाडला. याच दरम्यान कंगनाने हा फोटो शेअर करताना आपल्या लूकची तुलना ‘वॉरियर क्वीन’ शी केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगनाने ‘आज मेरे यार की शादी है..’ असे लिहिले आहे.

कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने ‘मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल. अशी माझी इच्छा आहे.’ दुसऱ्या एकाने ‘असं वाटतंय की तुमचंच लग्न आहे.’अशा कॉमेंन्टस केल्या आहेत.

कंगना राणावत आणि अंकिता लोखंडे दोघांनी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात एकत्रित काम केले होते. या चित्रपटात कंगना ‘राणी लक्ष्मीबाई’ च्या भूमिकेत आणि अंकिता तिची मैत्रिणी ‘झलकारीबाई’ च्या भूमिकेत दिसली होती. यामुळे कंगना अंकिताच्या संगीत सोहळ्यात उपस्थिती लावत त्याच्या लग्नातील कार्यक्रमाला खास बनवले. अंकिताच्या विवाहात काही मोजक्याच नातेवाईकांनी उपस्थिती लावली आहे.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

Back to top button