

पुढारी ऑनलाईन डेस्क : मारुती सुझुकीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जीम्नी ही कार (Maruti Suzuki New Car) लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने आता आणखी एक कार लॉन्च केली आहे. 'इनविक्टो' (Invicto) असे नव्या MPV कारचे नाव आहे. मारुती सुझुकीची ही नवी कार महागडी MPV प्रकारातील असणार आहे. या कारच्या किंमतीमुळे याची सोशल मीडियावर चर्चा रंगलेल्या आहेत.
मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वी या नव्या Invicto कारचा टीझर (Teaser of New Invicto Car) लॉन्च केला होता. ५ जुलै रोजी कंपनीने ही कार अधिकृतरित्या लॉन्च केली. कार लॉन्च होण्यापूर्वीच तिची चर्चा भरपूर होती. टिझरमधील कारचे ग्राफिक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते. त्यामुळे चाहत्यांना ही कार कधी येईल याची अतुरता लागून राहिलेली होती. आता ही कार लॉन्च झाल्यामुळे चाहत्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. ही चर्चेत असण्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे गेल्या यावर्षीची मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) ही आकर्षक डिझाईनमधील पहिली MPV कार आहे.
मारुतीची (Maruti Suzuki) सर्वात महागडी आणि लक्झरी MPV ५ जुलै रोजी भारतीय बाजारात लॉन्च झाली. कंपनीने या नवीन MPV मध्ये अनेक आकर्षक असे काही फीचर्स दिले आहेत. लॉन्च होण्यापूर्वी १९ जूनपासून या एमपीव्हीचे बुकिंग सुरू करण्यात आले होते.
मारुतीच्या (Maruti Suzuki) नवीन MPV मध्ये अनेक आकर्षक असे फीचर्स देण्यात आले आहेत. या फिचर्समध्ये सात आणि आठ सीट पर्याय, यूएसबी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 20.32 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, सहा स्पीकर, ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, 17.78 सेमी एमआयडी, गियर पोझिशन इंडिकेटर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर्ड टेलगेट, पुश बटण स्टार्ट यांचा समावेश आहे. स्टॉप, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, केबिन एअर फिल्टर, ईव्ही मोड स्विच, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एअरबॅग्ज, 360 व्ह्यू कॅमेरा, ईपीबी, ऑटो होल्ड, एबीएस, ईबीडी, व्हीएससी, टीपीएमएस, सुझुकी कनेक्ट व्हेईकल सोबत ट्रॅकिंग, चोरीच्या वाहनाचा इशारा, 17-इंच अलॉय व्हील्स, यात पॅनोरॅमिक सनरूफ सारखी फिचर्स आहेत.
मारुतीची ही नवीन MPV कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे. कंपनीने ही एमपीव्ही पेट्रोल, हायब्रीड व्हर्जनमध्ये उपलब्ध केलेली आहे. या एमपीव्हीमध्ये दोन लिटर पेट्रोल इंजिन क्षमता असेल. तसेच पेट्रोल हायब्रिड इंजिनमधून 112 kW पॉवर आणि 188 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट होईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. त्याचबरोबर, कारची हायब्रिड प्रणालीमुळे ही कार 137 किलोवॅट इतक्या क्षमतेसह अधिक शक्तिशाली असणार आहे. या MPV ला इको, नॉर्मल आणि पॉवर मोड मिळतात. एमपीव्हीला ई-सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह आणण्यात आले आहे.
कंपनीने अतिशय आकर्षक किमतीत Invicto लाँच केली आहे. Invicto ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 24.79 लाख रुपये आहे. तर त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 28.42 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा