Bajaj-Tirumph New Bike : बजाजची नवी बाईक… बुलेटसह ‘या’ मोटरसायकलला देणार फाईट | पुढारी

Bajaj-Tirumph New Bike : बजाजची नवी बाईक... बुलेटसह 'या' मोटरसायकलला देणार फाईट

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुचाकी आणि तीनचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी (दि. २७) मोठी खरेदी दिसून आली. देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि ब्रिटनची सर्वात मोठी मोटरसायकल कंपनी ट्रायम्फ (Triumph) या दोन दिग्गज कंपन्या भागीदारीमध्ये नवी बाईक (New Bike) लॉन्च करणार आहे. या दोन्ही कंपन्यांची एकत्रितपणे ही पहिली बाईक असणार आहे. त्यामुळे या बाईकची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे.

ट्रायम्फ (Triumph)  कंपनीने बजाज ऑटोच्या (Bajaj Auto) सहकार्याने नवीन बाईक (New Bike) डिझाइन केलेली आहे. ही नवीन बाईक भारतात जुलै 2023 च्या पहिल्या आठवड्यात लॉन्च करण्यात येईल अंदाज आहे. लॉन्चिपूर्वी ट्रायम्फ इंडियाने या बाईकचा एक टीझर जारी केला आहे. यात काही महत्त्वाचे तपशील उघड केले आहेत.

Triumph Speed 400

बजाज ऑटो आणि ट्रायम्फ (Bajaj-Triumph) या दोन दिग्गज कंपन्यांची भागीदारीमधील पहिली बाईक (New Bike) लाँच झालेली नाही.  ही बाईक 300-400 सीसी इंजिनसह सुसज्ज असेल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे रॉयल एनफिल्डच्या (Royal Enfield) ‘बुलेट’ला प्रतिस्पर्धक अशी ओळख या बाईकची असणार अहे. (Bajaj-Triumph New Bike)

Triumph Speed 400

बजाज – ट्रायम्फ यांच्यातील भागीदारीची घोषणा | Bajaj-Triumph New Bike

बजाज आणि ट्रायम्फ यांनी 2020 मध्ये भागीदारीची घोषणा केली, ज्या अंतर्गत त्यांनी ट्रायम्फच्या मध्यम आकाराच्या मोटारसायकली तयार करण्याची योजना आखली. बजाज ऑटोने यापूर्वी KTM आणि Husqvarna सोबत भागीदारी करून जास्त CC क्षमतेच्या इंजिनने सुसज्ज असणाऱ्या बाइक बाजारपेठेत आणलेल्या आहेत. त्यानंतर आता आगामी नवी बाईक हे बजाज ऑटोचे चाहत्यांसाठी खास आकर्षक अशी भेट असणार आहे.

Triumph Speed 400

बजाज आणि ट्रायम्फच्या भागीदारीमुळे येणाऱ्या या नव्या बाईकीची (Bajaj-Triumph New Bike) चर्चा मोटरसायकल चाहत्यांमध्ये आहे. याचा लुक आणि इंजिन क्षमता यामुळे या बाईकची क्रेझ खूप वाढत आहे. सोशल मीडियावर ट्रायम्फच्या काही बाईक व्हायरल होत आहेत.

Triumph Speed 400

नव्या बाईकचा परिणाम : शेअर मार्केटमध्ये चढ-उतार | Bajaj-Triumph

ही बाईक अजून लॉन्च झालेली नाही, मात्र त्यापूर्वीच गुंतवणूकदारांमध्ये या नव्या मोटरसायकल बद्दल क्रेझ दिसून येत आहे. मंगळवारी शेअर मार्केटमध्ये इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये बीएसईवर 1.5 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे ही वाढ 4678.80 रुपयांवर पोहोचली. मात्र यानंतर, प्रॉफिट-बुकिंगमुळे, किंमत मंदावली आणि शेवटी दिवसाअखेर हा शेअर 0.34 टक्क्यांनी घसरून 4620 रुपये (बजाज ऑटो शेअर किंमत) वर बंद झाला.

हेही वाचा

Back to top button