TATA PUNCH : फक्त ६६ हजारात घरी घेऊन या मिनी SUV! | पुढारी

TATA PUNCH : फक्त ६६ हजारात घरी घेऊन या मिनी SUV!

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील कार सेक्टरमध्ये मायलेज देणाऱ्या कार्ससोबतच मिनी एसयूव्ही (Mini SUV) कारची मागणीही झपाट्याने वाढली आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी त्यांच्या मायक्रो एसयूव्ही लाँच करण्यास सुरुवात केली आहे. (TATA PUNCH)

मिनी एसयूव्ही (Mini SUV) सेगमेंटमध्ये सध्या टाटा मोटर्सच्या ‘पंच’ कार (TATA PUNCH) चर्चेत आहे. ही एक सर्वात स्वस्त आणि देशातील सर्वात सुरक्षित मिनी एसयूव्ही असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याच पंचलाईनखाली टाटा मोटर्सने ग्राहकांना मीनी एसयुव्ही टाटा पंच खरेदी करण्यास आकर्षीत करत आहेत.

जर तुम्ही TATA PUNCH ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला ५.४८ लाख ते ९.०८ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु आम्ही येथे अशा किफायतशीर प्लॅनबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही ही SUV अगदी सहज घरी घेऊन जाऊ शकता.

कार सेक्टरबाबत माहिती देणारी वेबसाइट CARDEKHO वर दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही टाटा पंचचे प्युअर व्हेरिएंट घेतले तर कंपनीशी संबंधित बँक ५.९८ लाख रुपयांचे कर्ज देईल. या लोनवर, तुम्हाला ६६,५४९ रुपये किमान डाउन पेमेंट भरावे लागेल आणि त्यानंतर दरमहा १२,६५७ रुपये मासिक EMI भरावा लागेल.

टाटा पंचावरील (TATA PUNCH) कर्जाचा कालावधी बँकेने ६० महिन्यांसाठी निश्चित केला आहे. बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल. हा डाऊन पेमेंट प्लॅन वाचल्यानंतर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या कारची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्सबाबत जाणून घेऊया.

टाटा पंचच्या (TATA PUNCH) इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने 1199 cc चे इंजिन दिले असून ते 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 86 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

टाटा पंचच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, कंपनीने 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. यामध्ये ऑटो एसी, ऑटोमॅटिक वायपर आणि हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स दिले गेले आहेत. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग, ABS, EBD आणि रियर पार्किंग सेन्सर सारखे फीचर्स दिले आहेत. या मिनी SUV ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ज्यामुळे ती भारतातील सर्वात सुरक्षित मिनी SUV बनली आहे.

Back to top button