Hero MotoCorp-Harley Davidson : हार्ले डेव्हिडसनची स्टाईल, हिरो कंपनीचे टेस्टिंग; दोन दिग्गज कंपन्यांच्या नव्या बाईकची चर्चा

Hero MotoCorp-Harley Davidson : हार्ले डेव्हिडसनची स्टाईल, हिरो कंपनीचे टेस्टिंग; दोन दिग्गज कंपन्यांच्या नव्या बाईकची चर्चा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात हार्ले-डेविडसन (Harley-Davidson) आणि हिरो मोटोकॉर्प या दोन ऑटोमोबाईल क्षेत्रातील लोकप्रीय कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्या या दुचाकी प्रकारातील वाहनांसाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही कंपन्या आता एकत्रितपणे भारतात एक बाईक आणत आहेत. या नव्या आगामी बाईकची चर्चा खूप जोरात सुरु आहे. भारतात असंख्य चाहते असणाऱ्या रॉयल इनफिल्डच्या बुलेटला ही बाईक टक्कर देणार आहे. हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प या दोन्ही कंपन्या संयुक्तरित्या बनवत असणाऱ्या या बाईकचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. हे व्हायरल फोटो पाहता आकर्षक असे डिझाईन या बाईकचे आहे. विशेष म्हणजे याचा लुक पाहता बुलेटला लोक रामराम करणार की काय अशी चर्चा सध्या जोरात आहे. (Hero MotoCorp-Harley Davidson)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बाईकच्या स्टाइलिंगचे काम हार्ले-डेव्हिडसनने केले आहे, तर तिचे इंजिनिअरिंग, टेस्टिंग आणि डेव्हलपमेंट हीरो मोटोकॉर्प करत आहे. या स्टायलिश बाइकचे इंटरनेटवर प्रसिद्ध झालेले फोटोमध्ये असे दिसून येते की, हेडलाईटवर हार्ले डेविडसनचे नाव आहे. बुलेटला फाईट देणाऱ्या या बाईकची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व सामान्यांच्या खिशाला परवडेल इतकी या बाईकची किंमत असणार आहे अशी चर्चा आहे. (Hero MotoCorp-Harley Davidson)

बाईक कधी होणार लॉन्च (Hero MotoCorp-Harley Davidson)

या बाईकच्या लॉन्चिगबाबत दोन्ही कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनूसार सांगितले जात़ आहे की, कंपनी येत्या जुलै-ऑगस्टमध्ये या बाइकचे अनावरण करू शकते. दिवाळीच्या मुहूर्तावर ही बाईक विक्रीसाठी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

आगामी काळात हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प या मोटारसायकलची विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात देखील करण्याची शक्यता आहे.

भारतात बुलेटचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण सध्या या बाईकला टक्कर देण्यासाठी नवनवीन बाईक भारतीय बाजारपेठेत येत आहेत. टिव्हिएस (TVS) कंपनीने काही दिवसांपूर्वीच 'Ronin' ही बाईक लॉन्च केली आहे. होंडा कंपनीची CB 350 ही बाईक कमी कालावधीत चाहत्यांच्या पसंतीस उतरली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news