MG New SUV : ‘या’ नवीन एसयुव्हीची भारतीय कार चाहत्यांना भुरळ! जाणून घ्या किंमतीसह फिचर्स

MG New SUV : ‘या’ नवीन एसयुव्हीची भारतीय कार चाहत्यांना भुरळ! जाणून घ्या किंमतीसह फिचर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉरिस गॅरेज (MG) या मोटर इंडिया कंपनीने ग्लॉस्टर ही एसयुव्ही कार भारतात लॉन्च केली आहे. या ब्रिटिश कंपनीच्या या नव्या कारची भारतीय कार चाहत्यांना अतुरता होती. ही एसयुव्ही लॉन्च झाल्याच्या बातमीमुळे कार चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. (MG New SUV Car)

एमजी मोटर्सच्या कार भारतात महागड्या गाड्यांपैकी एक आहेत. ग्लॉस्टर हे त्यांचे नवे एसयुव्ही मॉडेल. 29 मे रोजी ही नवी एसयुव्ही कार लॉन्च करण्यात आली. कंपनीने लॉन्च केलेल्या नवीन एसयुव्हीची रंग आणि डिझाईनमुळे 'ब्लॅक स्टॉर्म एडिशन' अशी विशेष ओळख आहे. विविध फिचर्सनी सुसज्ज अशी ही कार आहे. या कारची एक्स शोरुम किंमत ४०.३० लाख रुपये इतकी आहे. ९ महिन्यांपूर्वी कंपनीने या SUV Gloster भारतात लॉन्च करणार अशी माहिती दिली होती. (MG New SUV Car)

ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्मचे डिझाइन |MG New SUV Design & Colour

ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्मचा रंग हा कारची आकर्षकता वाढवतो. त्याच्या बाह्य भागांना लाल अॅक्सेंटसह मेटॅलिक ब्लॅक पेंट थीम पहायला मिळते. याशिवाय रूफ रेल, स्मोक्ड ब्लैक टेल लाइट, विंडो सराउंड, फेंडर और फॉग गार्निश यासारख्या भागांना ब्लॅक फिनिशिंग दिले आहे.

ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्मचे इंजिन | MG Gloster Blackstorm

Gloster Blackstorm च्या इंजिनमध्ये विशेष असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये BS6 मानक असलेले 2.0-लिटर क्षमतेचे चार-सिलेंडर टर्बो डिझेलने सुसज्ज असे इंजिन आहे. या इंजिनमध्ये वेगवेगळ्या ड्राइव्ह मोडमध्ये 375Nm टॉर्क आणि 480Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. याचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

Gloster Blackstorm मध्ये 30 सेफ्टी फीचर्स | MG New SUV Car Features

Gloster Blackstorm मध्ये 30 सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट लेव्हल-1, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आणि अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC) यांचा समावेश आहे. याशिवाय काही खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

  • ऑटोमैटिक इमरजेंसी ब्रेकिंग (AEB)
  • ऑटोमैटिक पार्किंग असिस्ट (ADBG)
  • फॉरवर्ड कोलिशन वार्निंग (FCW)
  • लेन डिपार्चर वार्निंग (LDW)
  • ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन (BSD)
  • डोर ओपन वार्निंग (Dow)
  • रियर क्रॉस ट्रैफिक अलर्ट (RCTA)
  • लेन चेंज असिस्ट (LCA)
  • ड्राइवर थकान रिमाइंडर सिस्टम

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news