Harley Davidson : Hero कंपनीची घोषणा; हार्ले डेव्हिडसनची स्वस्तातील बाईक भारतात | पुढारी

Harley Davidson : Hero कंपनीची घोषणा; हार्ले डेव्हिडसनची स्वस्तातील बाईक भारतात

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील प्रसिद्ध दूचाकी कंपनी हिरो मोटो कॉर्पने (Hero MotoCorp) एक खुशखबर दिली आहे. हिरोने जगप्रसिद्ध बाईक हार्ले-डेव्हिडसनसोबत भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्याच्या संकल्पनेतून भारतात एक नवीन बाईक (Hero 440)  लॉन्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही बाईक हार्ले डेव्हिडसनचं (Harley Davidson) भारतातील स्वस्त मॉडेल असणार आहे. त्यामुळे ही बाईक चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.

हिरोची नवी बाईक हार्ले डेव्हिडसनच्या X440 (Harley Davidson X440) या मॉडेलवर आधारित असेल. 2024 वर्षी मार्चमध्ये ही बाईक लॉन्च केली जाईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. एलईडी लाईटसह नियो-रेट्रो लुक या बाईकचा असणार आहे. तसेच 440cc चे सिंगल सिलेंडर सह सुसज्ज असेल.

हिरोच्या बाईकचा लुक | New Bike Hero 440

हिरोच्या Hero 440 या नव्या बाईकच्या लुकबद्दल बोलायचे झाले, तर लूक हार्ले डेविडसन X440 सारखाच असेल. यात एक मस्क्यूलर फ्युएल टँक, एक गोल एलईडी हेडलॅम्प, गोल साइड मिरर, मोठा हँडल बार, सिंगल-पीस स्टेप-अप सीट, साइड-माउंट डबल एक्झॉस्ट सिस्टम आणि आकर्षक एलईडी टेललॅम्पसह नवीन-लूक सेक्शन सह सुसज्ज मिळते. तसेच, सिंगल-पॉड सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि डिझायनर मिक्स्ड मेटल अलॉय व्हील असतील अशी प्राथमिक माहिती आहे.

बाईकमध्ये 440cc इंजिन

Hero MotoCorp 440 ला Harley चे 440cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन मिळू शकते, जे जास्तीत जास्त 27hp पॉवर आणि 38Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. ही बाईक ताशी 160 किलोमीटर वेगाने धावू शकते. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतर कापू शकेल अशी प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा

Back to top button