Hot water borewell rajura : राजुरातील बोअरवेलमधून चक्क गरम पाणी...!

१२ वर्षे जुन्या बोअरवेलमधून २० ते २५ दिवसांपासून गरम पाण्याचा प्रवाह; प्राथमिक तपासणीत पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट
Hot water borewell rajura : राजुरातील बोअरवेलमधून चक्क गरम पाणी...!
Published on
Updated on

अजय ढवळे

वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा गावात गेल्या २० ते २५ दिवसांपासून एका जुन्या बोअरवेलमधून चक्क गरम पाणी येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १२ वर्षे जुना असलेल्या या बोअरवेलमधून अचानक गरम पाणी येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी आंघोळीसाठी वापरता येईल इतपत गरम असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Hot water borewell rajura : राजुरातील बोअरवेलमधून चक्क गरम पाणी...!
Washim news: जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवरील सोलर यंत्रणा धूळखात; लाखो रुपयांचा खर्च वाया?

राजुरा येथील या बोअरवेलमधून यापूर्वी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे तापमान अचानक वाढल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला ग्रामस्थांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही; मात्र सातत्याने गरम पाणी येत असल्याने या घटनेची चर्चा संपूर्ण गावात सुरू झाली.

Hot water borewell rajura : राजुरातील बोअरवेलमधून चक्क गरम पाणी...!
Washim News | जीर्ण इमारतीत भरते शाळा; राजकीय श्रेयवादात अडकली नवीन इमारत

या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाने बोअरवेलमधील पाण्याचे नमुने घेतले. प्राथमिक तपासणीत हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. तसेच पाण्यातील काही रासायनिक घटकांचे प्रमाण वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची अधिक गांभीर्याने दखल घेतली आहे.

Hot water borewell rajura : राजुरातील बोअरवेलमधून चक्क गरम पाणी...!
Washim news: कुटुंबीयांचा आंतरजातीय विवाहाला विरोध; प्रेमीयुगलाचा तलावात उडी घेऊन शेवट

दरम्यान, पाण्याचे नमुने पुढील सखोल तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणी अचानक गरम होण्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भूगर्भातील नैसर्गिक प्रक्रिया, रासायनिक बदल किंवा अन्य काही कारणामुळे पाण्याचे तापमान वाढले आहे का, याबाबत सध्या विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अधिकृत तपासणी अहवाल येईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही.

Hot water borewell rajura : राजुरातील बोअरवेलमधून चक्क गरम पाणी...!
Washim News | वाशिममध्ये शुक्रवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद; उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

गरम पाण्याचा हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांकडूनही उत्सुकता व्यक्त केली जात आहे. मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Hot water borewell rajura : राजुरातील बोअरवेलमधून चक्क गरम पाणी...!
Washim RTE news: आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील खासगी शाळांचे शासनाकडे शुल्क प्रतिपूर्ती तब्बल २० कोटी रुपये थकीत...

नागपूरच्या प्रयोगशाळेतील अहवालाकडे आता ग्रामस्थांसह प्रशासनाचे लक्ष लागले असून, या बोअरवेलमधून अचानक गरम पाणी येण्याचे गूढ नेमके काय, याचा उलगडा अहवालानंतरच होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news