Washim News | जीर्ण इमारतीत भरते शाळा; राजकीय श्रेयवादात अडकली नवीन इमारत

वाशिम तालुक्यातील काटा येथे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात
Washim Dilapidated School Building
Washim School Building Pudhari
Published on
Updated on

Washim Dilapidated School Building

वाशीम : राज्यात एकीकडे जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा गाजत असताना, वाशिम तालुक्यातील काटा गावात जुन्या जीर्ण इमारतीत शाळा भरत आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्या र्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या दिरंगाईच्या कारभारावर पालक वर्गांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

वाशिम तालुक्यातील काटा गावात जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न समोर आला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून शाळेची नवीन इमारत तयार असूनही ती अद्याप शाळेच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी तयार करण्यात आलेली ही इमारत सध्या वापराविना पडून आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.

Washim Dilapidated School Building
Washim news: कुटुंबीयांचा आंतरजातीय विवाहाला विरोध; प्रेमीयुगलाचा तलावात उडी घेऊन शेवट

तसेच इतर साहित्यही अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नवीन इमारत तयार असताना विद्यार्थ्यांना जुन्या जीर्ण इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे. राजकीय श्रेयवाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे इमारत शाळेच्या ताब्यात देण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इमारत तातडीने शाळेच्या ताब्यात द्यावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news