

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : "माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळाले नाही, याचे उत्तर त्यांनी कधीच दिले नाही. ते १९६० पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देत आहेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकत आहेत," असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
संबंधित बातम्या :
सरकार आणि ओबीसींच्या प्रतिनिधींच्या आजच्या बैठकीत, संवादातून मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त करून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सरकार ओबीसी आंदोलनाबद्दल गंभीर आहे. आज सरकार सोबत संवाद झाल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ओबीसी प्रतिनिधींना स्पष्टता येईल. शरद पवार हे सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळाले नाही, याचे उत्तर त्यांनी कधीच दिले नाही. शालिनीताई पाटील यांना एका मागणीसाठी पक्षातून का काढलं याचे उत्तरही त्यांनी कधीच दिले नसल्याचे ते म्हणाले.
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, काही राजकीय पक्षाचे नेते अस्थिरता निर्माण करण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करीत असतात. अस्थिरतेच्या पायऱ्यावरच त्यांची सत्ता निर्माण होऊ शकते, असे त्यांना वाटते. सध्या अस्थिरता कोण निर्माण करत आहे? हे लक्षात येईल. धनगर समाजाच्या उपोषणाला शरद पवार कधी का गेले नाहीत, कारण त्यांना माहित आहे की या सगळ्या गोष्टीतून अस्थिरता निर्माण करण्यामध्येच आपल्याला संधी आहे, असा चिमटा देखील मुनगंटीवार यांनी काढला.
हेही वाचा :