नाशिक ; पुढारी वृत्तसेवा, नाशिकमध्ये सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला मनोज जरांगे-पाटील( Manoj Jarange Patil) भेट देणार आहेत. येत्या ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ते नाशिकला येणार असल्याची माहिती दौऱ्याच्या आयोजक समितीचे सदस्य प्रदीप साळुंखे यांनी दिली.
जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गेल्या १४ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत ही मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण न सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व दिलेला शब्द व त्यासाठी आंदोलक जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत लक्षात घेता राज्यातील विविध भागांत साखळी उपोषण केले जात आहे. दरम्यान नाना बनकर, चंद्रकांत बनकर, राम खुर्दळ, योगेश नाटकर, संजय फडोळ, योगेश कापसे, श्रीराम निकम, अॅड. कैलास खांडबहाले, नितीन रोटे- पाटील, राम गहिरे, संदीप खुंटे, विकी देशमुख, प्रकाश धोंडगे, हरिभाऊ शेलार आदी उपस्थित होते.
हेही वाचा :