ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांचे हात बरबटलेले; आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांचे हात बरबटलेले; आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

पुणे : कारागृहातून दवाखाना, दवाखान्यातून पंचतारांकित हॉटेल असा प्रवास करणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या हालचाली संशयास्पद होत्या. ज्या दिवशी ललित पळाला त्या दिवशी पोलिसांना पैसे देऊन पळून गेल्याबरोबरच, यामध्ये पोलिसांचे हात बरबटल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. धंगेकर म्हणाले, पोलिस खात्याची भूमिका संशयास्पद आहे. सामान्य माणसांना पोलिस भेटत नाहीत, पण गुन्हेगारांना पंचतारांकित हॉटेलची मेजवानी देतात. पुणे शहर अमली पदार्थात बुडत चालले असताना पोलिस ललितसारख्यांवर मेहरनजर का करत आहेत, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंधरा दिवसापूर्वी ललित पळून गेल्यानंतर तो मद्रासमध्ये सापडला. एखाद्या सिनेेमातील पात्राप्रमाणे या सर्वांच्या संगनमताने तो जीवन जगत होता. पुणे पोलिसांनी राज्यात आणि राज्याबाहेर दहा पथके पाठवली होती. परंतु, तो पुणे पोलिसांना न सापडता मुंबई पोलिसांना सापडला. हे पुणे पोलिसांचे अपयश आहे. ड्रग्ज प्रकरणात डॉक्टर, पोलिस, कारागृहातील मेडिकल ऑफिसर, कारागृह अधिकारी तसेच ललितचे नातेवाईक यांचादेखील तपास करणे गरजेचे आहे. पुणे पोलिस दलातील अनेक अधिकारी ललितबरोबर संगनमताने हा उद्योग करताहेत हे सिद्ध होते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी धंगेकर यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news