नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोना तसेच वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर (Delhi pollution problem) प्रौढांसाठी 'वर्क फ्रॉम होम' सुरु करण्यात आले आहे. तर मग अशावेळी लहान मुलांसाठी शाळेत येण्याचा आग्रह का धरला जात आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर दिल्ली सरकारने पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.
(Delhi pollution problem ) वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे दिल्ली सरकार तसेच केंद्र सरकारकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले होते. आम्ही हे उपाय करीत आहोत, ते उपाय करीत आहोत असे सांगितले जात आहे. तर मग प्रदूषण का वाढत आहे, ( Delhi air pollution ) याचा खुलासा झाला पाहिजे, अशी विचारणा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत कानउघडणी केल्यानंतर दिल्ली सरकारने तातडीने बैठक घेत पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.