Gold Price Today : लग्नसराईत सोने खरेदीची संधी! दरात घसरण

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Price Today : सराफा बाजारात आज गुरुवारी (दि. २) पुन्हा सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी शुद्ध सोन्याचा दर (२४ कॅरेट) १८९ रुपयांनी कमी होऊन ४७,६१८ रुपयांवर (प्रति १० ग्रॅम) आला. चांदीच्या दरात प्रति किलोमागे १,३४२ रुपयांची घसरण झाली आहे.

इंडियन बुलियन आणि ज्लेवर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,६१८ रुपयांवर खुला झाला. काल बुधवारी हा दर ४७,८०७ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. आज शुद्ध सोन्याच्या दरात घसरण झाली. २३ कॅरेट सोन्याचा दर ४७,४२७ रुपये एवढा आहे. तर २२ कॅरेट सोने ४४ हजारांच्या खाली आले आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४३,६१८ रुपये आहे. १८ कॅरेट सोने ३५,७१४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,८५७ रुपये आहे. चांदीचा प्रति किलो दर ६०,७२७ रुपयांवर आला आहे. (हे गुरुवार दि. २ डिसेंबर दुपारपर्यंतचे अपडेटेड दर आहेत)

ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती, तरीही दरात घसरण

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती असतानादेखील भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत कमजोरी दिसून येत आहे. एमसीएक्सवरदेखील गोल्ड फ्यूचरमध्ये घसरण दिसून आली. यामुळे एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,७९१ रुपयांवर होता. गेल्या वर्षी सोने ५६ हजार रुपयांवर पोहोचले होते. सध्याचा सोन्याचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ हजार रुपयांनी कमी आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर घसरले आहेत. डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १,७८० रुपये आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

शुद्ध सोने म्हणजे काय?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Travel Vlog | वीकेंडला फिरता येईल असं कोल्हापूरपासून जवळच ठिकाण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news