अग्निशमन दलाने केली चिमुकलीची सुटका ; बेडरूमचा दरवाजा लॉक झाल्यामुळे पडली होती अडकून | पुढारी

अग्निशमन दलाने केली चिमुकलीची सुटका ; बेडरूमचा दरवाजा लॉक झाल्यामुळे पडली होती अडकून

वाकड : पुढारी वृत्तसेवा :

एक्सोटिका कल्पतरू सोसायटीमधील फ्लॅटमधील बेडरूमचा दरवाजा आतून लॉक झाल्यामुळेदीड वर्षीय चिमुकली अडकून पडली होती. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन चिमुकलीला बाहेर काढून तिच्या आईकडे सोपविले. त्यामुळे सर्वांना सुटकेचा नि:श्वास सोडला.

गुजरातमध्‍ये कोणत्‍या सरकारच्‍या काळात हिंसाचार झाला ? ‘सीबीएसई’च्‍या प्रश्‍नाने नवा वाद

पिंपळे सौदागर येथील एक्सोटिका कल्पतरू सोसायटीमध्ये इंगवले परिवार राहत आहे. त्यांची दीड वर्षीय मुलगी इशान्वी बेडरूममध्ये खेळत होती. त्यामुळे चुकून दरवाजा लॉक झाला. दरवाजा उघडता येत नसल्याने ती रडत होती व प्रचंड घाबरलीदेखील होती.

गुजरातमधील गिर सोमनाथमध्ये १० ते १५ बोटी बुडाल्याची शक्यता

दरवाजा उघडत नसल्याने घरच्यांची अवस्था अतिशय केविलवाणी झाली होती. याची तात्काळ माहिती अग्निशमन केंद्राला दिल्यानंतर अग्निशामक दलाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली.

नीरज चोप्रानं ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्ध्यांना प्रोत्साहन का दिलं?

मुख्य अग्निशमन दल पिंपरी येथील जवानांनी अग्निशमन साहित्याचा उपयोग करून दरवाज्याची कडी तोडून अलगद इशान्वीला बाहेर काढले आणि तिच्या आई-वडिलांकडे सुर्पूद केले.

लहान मुलांना शाळेत येण्‍याचा आग्रह का? दिल्‍ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

अग्निशमन दलाचे जवान विशाल फडतरे, बाळासाहेब वैद्य, दिग्विजय नलावडे, कृष्णा राजकर, सिद्धेश दरवेश, अर्जुन वाघमारे, स्मिता गौरकर, धनश्री बागुल, श्वेता गायकवाड यांनी ईशान्वी हिची सुखरूप सुटका केली.

Back to top button