Param Bir Singh suspends : परमबीर सिंग यांना ठाकरे सरकारचा तगडा झटका; सेवेतून निलंबित - पुढारी

Param Bir Singh suspends : परमबीर सिंग यांना ठाकरे सरकारचा तगडा झटका; सेवेतून निलंबित

मुंबई; पुढारी ऑनलाईन

गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ठाकरे सरकारने तगडा झटका दिला आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. (Param Bir Singh suspends)

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची (Param Bir Singh suspends) उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांना होमगार्डच्या महासंचालकपदी नेमण्यात आले होते. मात्र त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा आरोप करून खळबळ उडवून दिली. हा आरोप करून ते कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल २३४ दिवस फरार झाले. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते मुंबईत प्रकट झाले.

परमबीर सिंग यांच्यावर बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता या कारणावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयातून परतताच पहिल्याच दिवशी आज फाईलवर स्वाक्षरी करून परमबीर सिंग यांना तगडा हादरा दिला आहे.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल्स, बार, ऑर्केस्ट्रा चालकांकडून पोलिसांना १०० कोटीं रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करुन परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या आरोपांवरुन राज्य शासनाने चांदिवाल आयोग स्थापन केला आहे.

चांदीवाल आयोग गेले काही दिवस सचिन वाझे याची चौकशी करत आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिल्याने गेले काही महिने अज्ञातवासात गेलेले परमबीर सिंग हे मुंबईत दाखल झाले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button