Akola News : मनोज जरांगे- पाटलांसारख्या दिसणाऱ्या गुजर यांच्या ‘वंचित’ प्रवेशामुळे चर्चेंना उधाण | पुढारी

Akola News : मनोज जरांगे- पाटलांसारख्या दिसणाऱ्या गुजर यांच्या 'वंचित' प्रवेशामुळे चर्चेंना उधाण

अकोला; पुढारी वृत्तसेवा: अकोला शहरातील तुळशीराम गुजर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्यासारखे हुबेहुब दिसतात. त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील यशवंत भवन निवासस्थानी गुजर यांनी प्रवेश केला. Akola News

अकोल्यातील जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जाताना अनेकांनी त्यांना पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. Akola News

तुळशीराम गुजर हे अकोला शहरातील जुने शहर भागात राहतात. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा दिसत असल्याचे मला अनेकांनी सांगितले, माझ्यासोबत सेल्फीही घेतल्या. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button