तुमचे चमचामंडळ धुतल्या तांदळासारखे आहे का?; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा | पुढारी

तुमचे चमचामंडळ धुतल्या तांदळासारखे आहे का?; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

मुंबई; पुढारी ऑनलाईन

शरद पावर यांनी मांडलेल्या भूमिकेचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले. शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचं समर्थन संजय राऊत यांनी केलंय. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तुमचे चमचामंडळ धुतल्या तांदळासारखे आहे का? असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केलीय.

ते म्हणाले, शरद पवार अनुभवी आहेत. शरद पवार जे बोलले ती त्यांची चीड, संताप आणि वेदना आहेत. राजकीय सूड भावनेतून छळ केला जातोय. पण आम्ही घाबरणार नाही. पवार कधीही चुकीचं बोलत नाही. आम्हाला दिलेल्या त्रासाची किंमत भाजपला चुकवावी लागेल. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे.

दरम्यान, नागपूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आठवण काढली. यावेळी पवार हे देशमुख यांच्या विषयी भावनिक झाले. देशमुख यांच्याबद्दल शरद पवार म्हणाले, अनिल देशमुख यांनी त्यांच्याबाबत जे घडलं ते मला सांगितलं होतं. त्यामुळे मला वस्तुस्थिती माहीत आहे. देशमुख यांना जो त्रास दिला जात आहे. त्या त्रासाचा प्रत्येक मिनिट वसूल केला जाईल, असा इशाराच पवार यांनी दिला.

यावेळी पवार भावूक होऊन म्हणाले, की असे पहिल्यांदाच होत आहे की मी नागपूरला आलो आहे आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत. पक्षाच्या स्थापनेनंतर जेव्हा जेव्हा मी नागपूर आलो आहे तेव्हा देशमुख यांनी स्वागत व आदारातिथ्य केलं आहे. देशमुख यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांच्याबाबत जे घडलं आहे ते त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केला आहे. ते फरार आहेत व अनिल देशमुख यांना कोठडीत ठेवण्यात आलं आहे. या जिल्ह्यात देशमुख यांनी राष्ट्रवादी वाढवली आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

पहा व्हिडिओ : मुंबईत मराठी आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विशेष |balasaheb Thackeray

Back to top button