पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्बल ५ फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. पुरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत आवाहन केले आहे की,"कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत." ( Nagpur Rain Update )
संबधित बातम्या
नागपुरमध्ये मध्यरात्री (दि.२३) पावसाने हाहाकार माजवला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याने नागपूरकरांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सिताबर्डी भागालाही पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्बल ५ फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. पुरपरिस्थिती पाहता शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत चाअसे आवाहन केले आहे. व पूरपरिस्थिती बाबत अपडेट दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
हेही वाचा