‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ अशी सध्याच्या सरकारची परिस्थिती’; उद्धव ठाकरेंची टीका | पुढारी

'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' अशी सध्याच्या सरकारची परिस्थिती'; उद्धव ठाकरेंची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ अशी सध्याच्या सरकारची परिस्थीती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज (दि.१०) विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अमरावती येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पुर्वी सरकार मतपेटीतून येत होतं आता सरकार खोख्यातून जन्माला येतं आहे. मतदान कोणालाही केलं तरी सरकार माझंच येणार असा पायंडा पडला तर दमदाटी करून कोणीही देशाचा पंतप्रदान होऊ शकतो. त्यामुळे ‘राईट टू रिकॉल’ म्हणजेच लोकप्रतिनिधींनी जर चूक केली असेल तर त्याला परत बोलवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे का? याच्यावर आता देशात विचार व्हायला पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना हे नाव माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं आहे. निवडणूक आयोग पक्षाच चिन्ह देवू शकतो पण नाव देवू शकत नाही. मी माझ्या पक्षाच नावं दुसऱ्याला देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मी रूग्णालयात असताना रात्रीच्या गाठीभेटी सुरू होत्या, तेव्हा पूजापाठ कोण करत होतं ते त्यांना विचारा, अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. माझ मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न नव्हतं. अनपेक्षित मुख्यमंत्री झालो, पण शिवेसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. आजही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा माझा निश्चय असून भविष्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून जागावाटपाचा प्रस्ताव मागवला आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यावर विचार करू, असे यावेळी ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button