नागपुरातील साडी जगभरात प्रसिद्ध व्हावी; नितीन गडकरींची इच्छा | पुढारी

नागपुरातील साडी जगभरात प्रसिद्ध व्हावी; नितीन गडकरींची इच्छा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे एक भन्नाट कल्पना राबवणारे, नवनवीन स्वप्नं बघणारे व्यक्तिमत्व. स्वप्न बघून ते पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्याचे विविध नमुने त्यांनी आजवर नागपूरकर आणि देशवासीयांना दिले आहेत. आता नागपुरात तयार झालेल्या साड्या जगभर पोहोचाव्यात, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

एकेकाळी नागपुरातील हातमागावरील साड्या, पातळ प्रसिद्ध होते. आता पुन्हा बांगलादेश परिसरात हा हातमाग एका कार्यकर्त्यांचा माध्यमातून सुरू करण्यात आला. यातून आकर्षक साड्या तयार होत आहे. येथील साडी जगभरात जावी, अशी इच्छा असल्याचे गडकरींनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Back to top button