शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांना समन्स - पुढारी

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांना समन्स

वाशिम; पुढारी वृत्तसेवा

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना येत्या २० ऑक्टोबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मनी लाँडरिगच्या आरोपाखाली हे समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे भावना गवळींच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाशिममध्ये मोर्चा काढला होता.

यानंतर गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीकडून छापेमारी करण्यात आली. जवळपास ९ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर गवळी यांच्या महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी गवळी यांचे निकटवर्ती सईद खानला देखील अटक करण्यात आली.

यामुळे शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यांना या अगोदर ४ ऑक्टोबरला ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीने त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. आता ही मुद्दत संपत असून,खासदार भावना गवळींना दुसऱ्यांदा ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे.

येत्या २० ऑक्टोबरला त्यांना चौकशीकरिता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार यावेळी देखील खासदार भावना गवळी चौकशीसाठी उपस्थित राहतात की नाही हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button