राज ठाकरेंना उत्तर भारतीयांबद्‍दल प्रेम : गुरु माँ कांचन गिरी | पुढारी

राज ठाकरेंना उत्तर भारतीयांबद्‍दल प्रेम : गुरु माँ कांचन गिरी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

उत्तर भारतीय -मराठी लोकांमध्‍ये मतभेद नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्‍दलच्‍या मांडलेल्‍या भूमिकेवरुन गैरसमज निर्माण झाला आहे. त्‍यांची बिहार आणि उत्तर प्रदेशबद्‍दलचे मते अतिशय वेगळी आहेत. राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्‍दल प्रेम आहे, असे मत गुरु माँ कांचन गिरी यांनी व्‍यक्‍त केले. हिंदू राष्‍ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही गुरु माँ कांचन गिरी यांनी केले.

चीन्यांना धडा शिकवण्यासाठी स्पेशल त्रिशूल लष्कराकडे येणार

गुरु माँ कांचन गिरी आणि सूर्याचार्य यांनी आज ‘कृष्‍णकुंज’वर जावून राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी राज ठाकरे यांना अयोध्‍येला भेट देण्‍याचे निमंत्रण दिले. यानंतर माध्‍यमांशी बोलताना कांचन गिरी म्‍हणाल्‍या की, आम्‍ही केवळ हिंदुत्वाचा विचार करतो. यांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. निवडणुकीसाठी आपला धर्म वापरतात ते देशाला अडचणीत आणतात.

संतांनीच देशाचे नेतृ्‍व केले : गुरु माँ कांचन गिरी

फाळणीमुळे काश्‍मीरचे नुकसान झाले. काश्‍मीरचा प्रश्‍न हा तत्‍कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलला नेहरु यांनी निर्माण केला आहे. आज आपले राष्‍ट्र धोक्‍यात आहे. अफगाणिस्‍तानमध्‍ये जे झाले ते आपल्‍या देशात होईल. १० वर्षात या देशात हिंदूंना शरणार्थी व्‍हावे लागेल. हिंदुत्‍वासाठी सर्व नेत्‍यांना एकत्र आणण्‍यासाठी प्रयत्‍न करणार  आहे. देशातील नेत्‍यांना मार्गदर्शन करु. यापूर्वीही संतांनीच देशाचे नेतृत्‍व केले आहे. हिंदू राष्‍ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही गुरु माँ कांचन गिरी यांनी केले.

राज ठाकरेंचे अयोध्‍येत भव्‍य स्‍वागत करणार

राज ठाकरे जे बोलतात तेच करतात. त्‍यांच्‍यासारख्‍या नेत्‍याची देशाला गरज आहे. राज ठाकरे डिसेंबर महिन्‍यात अयोध्‍येला येतील. यावेळी त्‍याचे भव्‍य स्‍वागत केले जाईल, असेही गुरु माँ कांचन गिरी यांनी जाहीर केले.  यावेळी सूर्याचार्य म्‍हणाले, हिंदुत्‍वासाठी सर्वांनी एकत्र यावे. या देशातील प्रत्‍येक नागरिक याच्‍याशी जोडलेला आहे. हिंदुत्‍व स्‍वीकारुन सर्वांनी यासाठी प्रयत्‍न करावेत. या देशातील मागील दहा पिढ्या हिंदूच होत्‍या. सर्वांनी हिंदुस्‍थानमध्‍ये हिंदू म्‍हणून जगावे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button