jammu and kashmir : १४ दिवसात दोन अधिकाऱ्यांसह ९ जवान शहीद, ९ नागरिकांची हत्या

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून चकमकी सुरु आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून चकमकी सुरु आहेत.
Published on
Updated on

गेल्या दोन आठवड्यांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये (jammu and kashmir) दहशतवाद्यांकडून रक्तपात सुरु आहे. सीमेवरील पुँछ आणि राजौरी जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांशी मुकाबला सुरु आहे. आजही सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरु आहे, पण अजून एकही दहशतवादी सापडलेला नाही.

गेल्या १५ दिवसांत दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ९ जवान शहीद

काश्मीरमध्ये (jammu and kashmir) गेल्या १५ दिवसांत दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ९ जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर ९ नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काल काश्मीरमध्ये दोन स्थलांतरित मजुरांची हत्या करण्यात आली. हे बिहारी स्थलांतरित मजूर होते.

गेल्या सात दिवसांपासून ज्या पद्धतीने भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा सामना केला जात आहे ते पाहता त्यांनी पाकिस्तानी कमांडोंकडून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

काश्मिरात गेल्या १५ दिवसांपासून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तपात होऊनही आतापर्यंत एकाही दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं नाही आणि मारला गेला असेल, तर अजून मृतदेह मिळालेला नाही.

सर्वप्रथम, पुँछच्या डेरा वाली गलीमध्ये १० ऑक्टोबरच्या रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद झाले. यानंतर, या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी गेलेल्या लष्कराच्या जवानांवर १४ ऑक्टोबर रोजी पुँछच्या नर खासच्या जंगलात दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात पुन्हा दोन जवान शहीद झाले. एक जेसीओ आणि एक जवान बेपत्ता या दोघांचे मृतदेह १६ ऑक्टोबर रोजी सापडले.

आतापर्यंत ९ सामान्य नागरिकांची हत्या

दहशतवाद्यांनी आठ वेगवेगळ्या केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ९ सामान्य नागरिकांची हत्या झाली आहे. यामध्ये स्थलांतरित मजूर, श्रीनगर येथील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच व्यावसायिकाचा समावेश आहे.

अलिकडच्या काळात प्रथमच लष्कराने आपले दोन अधिकारी आणि सात सैनिक गमावले आहेत. जर सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवल्यास पुँछच्या जंगलात, गेल्या आठ दिवसांपासून भारतीय लष्कराचे हजारो जवान पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित दहशतवाद्यांशी लढत आहेत. त्यात पाकिस्तानी कमांडोचाही समावेश असू शकतो.

लष्करानेही आता एका भागात दहशतवाद्यांना घेरले आहे. ऑपरेशनमध्ये पॅरा कमांडो आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. आता हा एक प्रयत्न आहे की जरी ऑपरेशनला बराच वेळ लागला, लागला नुकसान जास्त होणार नाही.

बऱ्याच काळानंतर जम्मू -काश्मीरमध्ये (jammu and kashmir)  दहशतवाद्यांशी झालेली चकमक लांबली आहे. उंच डोंगर आणि घनदाट जंगलांमुळे कारवाई करण्यात अडचण येत आहे, पण दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची ग्वाही लष्कराने दिली आहे.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news