बाल्कनीत चंद्र पहायला गेले अन् जुळ्या सत्य आणि सूर्यचा २५ व्या मजल्यावरून पडून अंत झाला | पुढारी

बाल्कनीत चंद्र पहायला गेले अन् जुळ्या सत्य आणि सूर्यचा २५ व्या मजल्यावरून पडून अंत झाला

गाझियाबाद; पुढारी ऑनलाईन

गाझियाबादमध्ये रात्रीच्या वेळी बाल्कनीत एकत्र बसलेल्या दोन जुळ्या भावांचा संशयास्पद परिस्थितीत २५ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सिद्धार्थ विहारमधील प्रतीक ग्रँड येथे घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

सीओ फर्स्ट महिपाल सिंह यांनी सांगितले की दोन्ही मुलांची नावे सूर्य आणि सत्य आहेत. ते नववीमध्ये शिकत होते. घटनेबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. बाल्कनीमध्ये एक खुर्ची ठेवलेली आढळली आहे. सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पलानी मुदलिया, मूळ चेन्नई , प्रतीक ग्रँड सोसायटीच्या २५ व्या मजल्यावर आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना पत्नी आणि मुलीसह दोन जुळी मुले आहेत. पलानी ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेले होते. त्यांचे कुटुंब शनिवारी रात्री घरी होते. रात्री साडेदहाच्या सुमारास पत्नी राधा टीव्ही पाहिल्यानंतर झोपी गेली. रात्री १२ च्या सुमारास त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांची दोन्ही मुले बाल्कनीमध्ये आहेत. त्यांनी दोघांनाही झोपायला सांगितले.

संबंधित बातम्या

मुलांनी काही वेळात येतो म्हणाले आणि आईकडे पाणी मागितले. सीओ यांनी सांगितले की, संभाषणादरम्यान राधा यांनी सांगितले की दोन्ही मुलांनी सांगितले होते की आज चंद्र दिसत नाही, ते चंद्र पाहिल्यानंतर येतील. थोड्या वेळाने राधा बाल्कनीत भेटायला गेली आणि अपघाताची माहिती मिळाली. तिने ताबडतोब दोन्ही मुलांना रुग्णालयात नेले आणि पतीला याबाबत माहिती दिली. मुलांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. सीओच्या मते, बाल्कनीमध्ये खुर्चीच्या वर एक पाटा ठेवलेला आढळला. पोलिस या प्रकरणात सर्व बाजू पडताळून पाहत आहेत.

मोबाइल हिस्ट्रीत गेमची नोंद नाही

बाल्कनीत जे दिसले त्यामध्ये मुले मोबाईल गेम खेळत असल्याची चर्चा होती. मात्र, या प्रकरणी प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही अचूक माहिती मिळाली नाही. विजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी योगेंद्र मलिक यांनी सांगितले की दोन्ही मुलांचे मोबाईल तपासले गेले. त्यांच्या हिस्ट्रीमध्ये कोणताही खेळ खेळला गेला नाही. यानंतरही मोबाईल पुढील तपासासाठी पाठवला जाईल. जर हिस्ट्री क्लिअर केली गेली असेल, तर त्याबद्दल माहिती उपलब्ध होईल.

सत्य आणि सूर्य नेहमी एकत्र होते

माहितीनुसार, सूर्य सत्यापेक्षा एक मिनिट मोठा होता. दोघे नेहमी एकत्र राहत असत. ते एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकले. लोकांच्या मते, दोन्ही भाऊ सर्व वेळ एकत्र असायचे. एक भाऊ घरी आहे आणि दुसरा बाहेर आहे असे कधीच दिसले नाही.

संशयास्पद अजून तरी काही नाही

या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब शोकात आहे. दोन्ही मुलांची आई राधा फक्त रडत होती आणि वारंवार सांगत होती की जर तिने दोघांना आत नेऊन झोपवले असते तर कदाचित असे घडले नसते. कुटुंबातील सदस्यांनी दोन्ही मुलांच्या वागण्यात काही असामान्य असल्याचे नाकारले आहे. पोलीस सर्व बाबी तपासत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button