छगन भुजबळ : ‘महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी धाडसत्र’ | पुढारी

छगन भुजबळ : 'महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी धाडसत्र'

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्र्यावर आणि ते मानत नसतील तर त्यांच्या नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणाकंडून धाडी टाकण्यात येत आहेत. या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्यांना फटका बसणार असल्याचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळ दोन दिवस पूर्व विदर्भाच्या दौर्‍यावर आले आहेत. यावेळी सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी नागपुरात संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकत नाही. आता मध्यमवर्गींयांवरही आयटीच्या धाडी पडतात, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. छगन भुजबळ यांनी ईडी आणि आयकर विभागाकडून टाकण्यात येणाऱ्या धाडींवर भाष्य केलं. माझ्या कुटुंबावर १८ वेळा धाडी टाकण्यात आल्या. मी जेलमध्ये गेल्यानंतरही धाडी टाकण्यात आल्या. ये जनता है सब जानती है, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यासाठी मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांवर छापे टाकण्यात येत आहेत हे चुकीचं आहे. भाजपन याचा विचार करावा, असं करुन त्यांच्या लोकप्रियतेवरच परिणाम होईल. देशातील मोठ्या पैसेवाल्यांकडे यंत्रणा दोन तीन दिवस छापे टाकते मात्र सर्वसामान्य लोकांच्या घरी सात आठ दिवस छापे टाकले जातात. देशात यापूर्वी असं कधीचं घडलं नाही. देशातील लोकांनी अशा घटना पाहिल्या नव्हत्या. हा महाराष्ट्र आहे अशा घटनांमुळे मागं हटणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमधील एका मंत्र्यांचे घडे भरले असल्याची टीका केली होती. यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. विखे पाटलांनी दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी स्वत: चे घडे अगोदर तपासावेत, असं भुजबळ म्हणाले.
हे ही वाचलं का?

 

Back to top button